
Donald Trump
sakal
वॉशिंग्टन : ‘ब्रिक्स’ देशांविरोधात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘ब्रिक्स गट अमेरिकी डॉलरविरोधात काम करीत आहेत,’’ असा आरोप ट्रम्प यांनी केला. या संघटनेत सामील होणाऱ्या देशांना आयातशुल्काची धमकी दिल्यानंतर सगळ्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ट्रम्प म्हणाले.