ब्रिटनच्या नेत्याची निवड पाच सप्टेंबरला

राजकीय तिढा: कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातील निवडणूक प्रक्रिया सुरु
Britain leader elected on September 5 Conservative Party politics
Britain leader elected on September 5 Conservative Party politicssakal

लंडन : बोरीस जॉन्सन यांनी पंतप्रधान पद सोडल्यानंतर ब्रिटनचे नेतृत्व करण्यासाठी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षात चुरस निर्माण झाली आहे. नेता निवडीबाबतची पक्षांतर्गत समिती पाच सप्टेंबरला ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानाचे नाव जाहीर करेल, असे या पक्षातर्फे आज जाहीर करण्यात आले. सत्ताधारी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या ‘१९२२ समिती’ने पक्षांतर्गत निवडणुकीचे वेळापत्रक तयार केले आहे. जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील ऋषी सुनक आणि लिझ ट्रस या वरीष्ठ मंत्र्यांसह अकरा जणांनी पंतप्रधान पदासाठी इच्छुक असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अधिक चुरस निर्माण झाली असून निवडणूक प्रक्रिया अत्यंत सुरळीतपणे पार पाडून पाच सप्टेंबरला पक्षाचा आणि देशाचा नवा नेता जाहीर करू, असे समितीतर्फे सांगण्यात आले आहे.

अशी होईल निवडणूक

समितीने आखून दिलेल्या नियमानुसार, पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असलेल्या खासदाराने पक्षाच्या इतर किमान वीस खासदारांचा पाठिंबा मिळविणे आवश्‍यक आहे. असा पाठिंबा मिळवून शर्यतीत टिकलेल्या खासदाराला पुढील फेरीत जाण्यासाठी किमान तीस मतांची आवश्‍यकता असेल. या दोन्ही फेऱ्या येत्या दोन दिवसांत होणार आहे. यातून अंतिम दोन उमेदवार निश्‍चित न झाल्यास पुढील आठवड्यात पक्षांतर्गत मतदानाची आणखी एक फेरी होईल.

पहिल्या फेरीत सुनक यशस्वी

पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असलेले भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी मंत्री ऋषी सुनक यांनी वीस खासदारांचा पाठिंबा मिळवून पहिली फेरी पार केली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. इतरही काही उमेदवार ही फेरी पार करण्याची शक्यता आहे. भारतीय वंशाच्या प्रिती पटेल यांनी आपली उमेदवारी जाहीर केली नसली तरी त्या अखेरच्या क्षणी निवडणूकीत उतरू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com