ब्रिटनमध्ये त्रिशंकू स्थिती 

केदार लेले (लंडन)
शुक्रवार, 9 जून 2017

ब्रेक्झिटच्या कट्टर समर्थक थेरेसा मे यांच्या नेतृत्वाखालील कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ताज्या निवडणूक निकालानंतर फारसा आनंद झालेला दिसत नाही. ब्रेक्झिटचा निवडणुकीत अर्थकारणाच्या अंगानेच विचार झाला. स्थलांतरीतांचा मुद्दा फारसा चर्चेत नव्हता. कारण, कॉन्झर्व्हेटिव्ह आणि लिबरल पक्षाची याबाबतची भूमिका समान आहे. 

ब्रेक्झिटच्या कट्टर समर्थक थेरेसा मे यांच्या नेतृत्वाखालील कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला ताज्या निवडणूक निकालानंतर फारसा आनंद झालेला दिसत नाही. ब्रेक्झिटचा निवडणुकीत अर्थकारणाच्या अंगानेच विचार झाला. स्थलांतरीतांचा मुद्दा फारसा चर्चेत नव्हता. कारण, कॉन्झर्व्हेटिव्ह आणि लिबरल पक्षाची याबाबतची भूमिका समान आहे. 

मध्यवर्ती लोकसभा निवडणुकीत ब्रिटनमध्ये त्रिशंकु स्थिती निर्माण झाली असून पंतप्रधान थेरेसा मे यांच्या कॉनझर्व्हेटिव्ह पक्षाला त्यांचे बहुमत गमवावे लागले आहे. या निवडणुकीत देशातील सर्वांत मोठा पक्ष म्हणून कॉनझर्व्हेटिव्ह पक्षाचे आपले स्थान कायम राखले आहे. मुख्य विरोधी लेबर पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मोठा फायदा झाला आहे. 

हार्ड ब्रेक्झिट विरुद्ध सॉफ्ट ब्रेक्झिट 
ब्रेक्झिट म्हणजेच ब्रिटनने युरोपीयन महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यावर युरोपीयन महासंघाचे समर्थक डेव्हिड कॅमेरून यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ब्रिटनच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान म्हणून थेरेसा मे यांनी जबाबदारी स्वीकारली होती. 

ब्रेक्झिट करण्यासाठी कॉनझर्व्हेटिव्ह पक्षाला बहुमत आणि बळकटी मिळावी या साठी पंतप्रधान म्हणून थेरेसा मे यांनी मध्यवर्ती लोकसभा निवडणुक जाहीर केली. पण, हार्ड ब्रेक्झिटचे समर्थन करणाऱ्या पंतप्रधान थेरेसा मे आणि कॉनझर्व्हेटिव्ह पक्ष यांची निवडणूक लढण्याची, लढवण्याची रणनितीही काहीशी कमकुवत आणि निष्प्रभ ठरली. तर सॉफ्ट ब्रेक्झिटचे समर्थन करणाऱ्या जेरेमी कॉर्बेन आणि त्यांच्या लेबर पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मोठा फायदा झाला. 

लेबर पक्ष सत्तेवर येण्याची दाट शक्यता
सर्वांत मोठा पक्ष म्हणून कॉनझर्व्हेटिव्ह पक्षाचे आपले स्थान कायम राखून सुद्धा हे निकाल पंतप्रधान थेरेसा मे यांच्यासाठी निराशजनक ठरण्याची शक्यता आहे. तर विरोधी लेबर पक्ष अल्पमतातील सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचे लेबर पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले. निवडणुकीत उत्पन्न झालेल्या त्रिशंकु स्थितीतून मार्ग काढण्यासाठी कॉनझर्व्हेटिव्ह पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी डेमोक्रॅटिक युनियनिस्ट पक्षाने पाठिंबा द्यायची तयारी दर्शवली आहे. ब्रिटनमध्ये त्रिशंकु स्थिती निर्माण होणार अशी चिन्ह दिसताच काळ रात्री पासून पौंड डॉलर विरुद्ध घसरला. जिथे डॉलर विरुद्ध पौंडची घसरण सुरु होती तिथे ब्रिटिश स्टॉक मार्केट तेजीत दिसून आले. 

ठळक घडामोडी 

  • मध्यवर्ती लोकसभा निवडणुकीत ब्रिटनमध्ये त्रिशंकु स्थिती 
  • कॉनझर्व्हेटिव्ह पक्षाला ३१८, तर लेबर पक्षाला २६२ जागा मिळण्याची शक्यता 
  • लेबर पक्षाचे जेरेमी कॉर्बेन यांची पंतप्रधान थेरेसा मे यांच्या राजीनाम्याची मागणी 
  • पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा देणार नसल्याचे स्पष्टीकरणं 
  • सरकार बनवण्यासाठी कॉनझर्व्हेटिव्ह पक्षाला डेमोक्रॅटिक युनियनिस्ट पक्षाचा पाठिंबा 
  • पौंड डॉलर विरुद्ध घसरला, पण ब्रिटिश स्टॉक मार्केट तेजीत 
Web Title: britian election no clear majority international news marathi news theresa may