Viral VIDEO: मक्कामधील पवित्र 'काबा'समोर बुरखा घातलेल्या महिलेचा डान्स; मुस्लिम जगतात संतापाची लाट

Hajj 2024 Viral VIDEO: मुस्लिमांसाठी हज हे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी जगभरातील मुस्लिम येत असतात.
 Burqa Clad Woman
Burqa Clad Woman

नवी दिल्ली- मुस्लिमांसाठी हज हे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे. याठिकाणी जगभरातील मुस्लिम येत असतात. या ठिकाणाबाबत त्यांच्यामध्ये अत्यंत आदर आणि विश्वास असतो. असे असताना सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओमुळे मुस्लिम जगतात संतापाची लाट उसळली आहे. बुरखा घातलेली एक महिला मक्कातील काबासमोर नृत्य करत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.

जगभरातील मुस्लिम नमाज पढत असताना काबाकडे तोंड करत असतात. त्यांच्यासाठी ही पवित्र आणि इस्लाम धर्माच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे. त्यामुळे काबासमोर नृत्य करणाऱ्या बुरखा घातलेल्या महिलेल्या पाहून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हज यात्रेसाठी जगभरातील मुस्लिम सौदी अरेबियातील मक्का आणि मदिना येथे येत आहेत. आयुष्यात एकदा तरी मक्का-मदिनाला भेट द्यावी असं इस्लाममध्ये म्हणण्यात आलं आहे.

 Burqa Clad Woman
Viral Video : इतनी खुशी! नवरदेवाने घेतली रस्त्यावर लोळण, हा डान्स पाहून नवरी पळून जाऊ नये म्हणजे मिळवलं!

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, काबासमोर अनेक यात्रेकरु दिसत आहेत. येथे एक महिला नृत्य करताना दिसते. सोशल मीडियावर यावरून वातावरण तापलं आहे. महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. महिला नेमकी कोण आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही. महिलेविरोधात काही कारवाई केल्याचं अजून तरी समोर आलेलं नाही. महिलेने हिजाब घातलेला आहे आणि तिचा चेहरा व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाहीये.

सोशल मीडियावर संतापाची लाट दिसत असली तरी काही नेटकऱ्यांनी तिचं समर्थन देखील केलं आहे. एका युझरने म्हटलं की, 'महिला दक्षिण-पश्चिम नायजेरियाची असून ती योरुबा समाजाची आहे. त्यांच्या संस्कृतीमध्ये नृत्य करण्याला खूप महत्त्व आहेत. ते नृत्याला त्यांच्या धर्मापासून वेगळे करू शकत नाहीत. अल्ला सगळ्यांना मार्ग दाखवो.'

 Burqa Clad Woman
Viral Lovestory Video : तिला वाटलं त्याने फसवलं, पण तो देत होता मृत्यूशी झुंज ; अश्रू अनावर करणारी ही अविश्वसनीय जोडी होतीये व्हायरल,व्हिडीओ पाहिलात का?

एका युझरने महिलेवर टीका केली आहे. तो म्हणाला की, 'काबा एक पवित्र ठिकाण आहे. या ठिकाणाची पवित्रता जपायला हवी. कोट्यवधी मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जातील असं कोणी काही करु नये.' रिपोर्टनुसार, १.३ कोटी लोक सौदी येथे हज दर्शनासाठी आले आहेत. याशिवाय अनेक यात्रेकरु याठिकाणी येणार आहेत. सौदी अरेबियाने स्पष्ट केलंय की, जे हज संबंधी नियमांचे उल्लंघन करतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा दिली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com