California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

बिली मार्कस यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरच्या पोस्टमध्ये म्हटलं की, ही आजवरची सर्वाच मोठी मानवी उपलब्धी आहे. तब्बल ९ वर्षांनंतर १ हजार ६०० फुट हायस्पीड रेल्व आणि ११ अब्ज डॉलर्स.. आणि हे सोळाशे फूट चालण्यासाठी तब्बल पाच मिनिटे लागतात.. ही हायस्पीड रेल्वे खरोखरच मोठी गोष्ट आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
California Bridge
California BridgeEsakal

नवी दिल्लीः अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया येथे एक चक्रावून टाकणारा प्रकार पुढे आला आहे. इथे सरकारने एक असा पूल बनवलाय ज्याचा रस्ता कुठेच जात नाही. या पुलासाठी तब्बल ११ बिलियन डॉलर खर्च आला आहे. शिवाय पूल बांधण्यासाठी ९ वर्षांचा वेळ खर्ची पडलाय. त्यामुळे हा पूल सध्या जागतिक पातळीवर चेष्टेचा विषय ठरला आहे.

या पुलावरुन अनेकांनी हायस्पीड रेल्वे अथॉरिटीचे कान पकडले आहेत. सदरील पूल सॅन फ्रान्सिस्कोला लॉस एन्जिलिसला जोडण्याच्या उद्देशाने आणि बुलेट ट्रेनचा एक भाग म्हणून उभारण्यात आलेला होता.

दरम्यान, इलॉन मस्क आणि Dogecoin चे फाऊंडर बिली मार्कस यांनी या प्रकल्पाची थट्टा केली आहे. मस्क यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर दुःखी, रडणारा इमोजी शेअर करत निराशा व्यक्त केली आहे.

California Bridge
क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

दुसरीकडे बिली मार्कस यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरच्या पोस्टमध्ये म्हटलं की, ही आजवरची सर्वाच मोठी मानवी उपलब्धी आहे. तब्बल ९ वर्षांनंतर १ हजार ६०० फुट हायस्पीड रेल्व आणि ११ अब्ज डॉलर्स.. आणि हे सोळाशे फूट चालण्यासाठी तब्बल पाच मिनिटे लागतात.. ही हायस्पीड रेल्वे खरोखरच मोठी गोष्ट आहे, असा चिमटा त्यांनी काढला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com