कोरोनाला घाबरवण्यासाठी कंबोडिया बुजगावणे

वृत्तसंस्था
Monday, 12 October 2020

कोरोना विषाणूला पळवून लावण्यासाठी कंबोडियातील एका गावातील शेतकऱ्याने चक्क बुजगावणे तयार केले आहे. हातात काठी, डोक्यावर हेल्मेट घातलेले हे बुजगावणे सोशल मिडीयामुळे चर्चेचा विषय ठरले.

त्रापीयांग स्ला (कंबोडिया) - कोरोना विषाणूला पळवून लावण्यासाठी कंबोडियातील एका गावातील शेतकऱ्याने चक्क बुजगावणे तयार केले आहे. हातात काठी, डोक्यावर हेल्मेट घातलेले हे बुजगावणे सोशल मिडीयामुळे चर्चेचा विषय ठरले.

खमेर भाषेत बुजगावण्याला टिंग माँग असे म्हणतात. कंबोडियातील अनेक गावांत डेंग्यू तसेच अतिसारामुळे गावकरी त्रस्त आहेत. त्यात कोरोनामुळे भर पडली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशावेळी अनेकांनी बुजगावणे तयार केले आहे. सोक चॅनी नावाच्या 45 वर्षीय शेतकरी महिलेने याच उपायाचा अवलंब केला आहे. राजधानी न्हॉम पेन्हपासून काम्पोंग चाम प्रांतातील तिचे गाव 110 किलोमीटर अंतरावर आहे. लाकडी घरासमोर तिने दोन ठिकाणी असे बुजगावणे ठेवले आहे. धोकादायक आजार बळावतात तेव्हा टिंग माँग उभे करण्याची श्रद्धा पुर्वापार चालत आल्याचे तिने आवर्जून सांगितले. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तोन फियांग या शेतकऱ्याने सुद्धा असेच बुजगावणे तयार केले आहे. पहिले बुजगावणे तुटल्यानंतर त्याने दुसरे बनविले. एप्रिलपासूनच  त्याने घरासमोर बुजगावणे उभे केले.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फक्त २८३ रुग्ण
वास्तविक जगाचा विचार केल्यास कोरोना संसर्गाच्या बाबतीत कंबोडिया हा देश सुदैवी असल्याचे आतापर्यंतचे चित्र आहे. केवळ २८३ रुग्ण आणि एकही मृत्यू नाही अशी आकडेवारी आहे. अर्थात चाचण्यांच्या अभावी अशी स्थिती असल्याचे तज्ञांना वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cambodian farmers deploy scarecrows to ward off the corona virus

Tags
टॉपिकस
Topic Tags: