

Justin Trudeau Katy Perry Kiss Photo Goes Viral
esakal
Justin Trudeau Katy Perry Kissing Viral Photo : कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो आणि हॉलिवूडची पॉप स्टार केटी पेरी यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत दोघेही एका यॉटवर रोमँटिक क्षणात हरवलेले दिसत आहेत. चुंबन घेताना आणि एकमेकांच्या बाहुपाशात असलेले हे फोटो पाहून नेटकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जुलै 2025 मध्ये या दोघांना एका कॉन्सर्टनंतर डिनर करताना पाहिलं गेलं होतं, तेव्हापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता हा फोटो समोर आल्याने त्या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे.