कॅनडाने भारतातील प्रवाशांवरील उठवली बंदी; पुन्हा सुरू होणार विमानसेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

airport

कॅनडाने भारतातील प्रवाशांवरील उठवली बंदी; पुन्हा सुरू होणार विमानसेवा

नवी दिल्ली : कॅनडामध्ये राहणाऱ्या हजारो भारतीयांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कॅनडाने जवळपास 5 महिन्यांनंतर भारतातून कॅनडाला जाणाऱ्या विमानांवरील बंदी हटवली आहे. कॅनडाने भारतामधील कमर्शियल आणि प्रायव्हेट फ्लाईट्सवर 26 सप्टेंबरपर्यंत बंदी लागू केली होती.

हेही वाचा: PM मोदींनी अमेरिका दौऱ्यात काय केलं? वाचा सविस्तर

कॅनडा सरकारने आपल्या एका प्रेस रिलीजमध्ये म्हटलंय की, 27 सप्टेंबर 2021 पासून भारतातून कॅनडासाठी जाणाऱ्या फ्लाईट्सवरील बंदी हटवण्यात आली आहे. आता ही उड्डाणे पुन्हा एकदा सुरु होतील. यावर्षीच्या एप्रिल महिन्यात कॅनडाने ही बंदी लागू केली होती. त्यावेळी भारत कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेशी झगडत होता. भारताची सरकारी एअरलाईन कंपनी एअर इंडिया 30 सप्टेंबरपासून आपली उड्डाणे सुरु करु शकते. कॅनडा ट्रान्सपोर्टने म्हटलंय की, प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मान्यताप्राप्त लॅबमधून कोरोना व्हायरसची निगेटीव्ह टेस्ट रिपोर्ट दिल्ली एअरपोर्टवर दाखवणे गरजेचे असणार आहे. हा रिपोर्ट फ्लाईटच्या उड्डाणापूर्वी 18 तासाच्या आतील असणे आवश्यक आहे.

हेही वाचा: शिकागोत रेल्वे अपघात; तीन जण ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

या गाईडलाईन्सचे करावं लागेल पालन

कॅनडाला जाणाऱ्या भारतीय प्रवाशांना दिल्लीमधील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टमधील जीनस्ट्रींग्स लॅबमधून कोरोना मॉलिक्यूलर टेस्टची निगेटीव्ह रिपोर्ट आणावी लागेल. हा रिपोर्ट फ्लाईटच्या डिपार्चर टाईमच्या 18 तास आधीची असणे गरजेचे आहे. बोर्डिंगच्या आधी एअर ऑपरेटर पॅसेंजर्सच्या टेस्ट रिपोर्टची तपासणी करतील जेणेकरुन प्रवाशी कॅनडाला जाण्यास योग्य आहेत की नाही, हे स्पष्ट होईल.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :India
loading image
go to top