काबूलमध्ये स्फोटात १२ ठार; दहा जखमी

पीटीआय
Thursday, 14 November 2019

अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या बाँबस्फोटात बारा जण ठार झाले. शहराच्या कसाबा भागामध्ये एका वाहनात झालेल्या बाँबस्फोटात हे बारा जण ठार झाले, तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अद्याप या बाँबस्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही.

काबूल - अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये झालेल्या बाँबस्फोटात बारा जण ठार झाले. शहराच्या कसाबा भागामध्ये एका वाहनात झालेल्या बाँबस्फोटात हे बारा जण ठार झाले, तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अद्याप या बाँबस्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही.

अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ता नसरत रहिमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाजवळील मंत्रालयाच्या परिसरात स्थानिक वेळेनुसार सकाळी सव्वासातच्या सुमारास बाँबस्फोट करण्यात आला. या बाँबस्फोटामुळे या परिसरातील वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर, बाँबस्फोटात बारा जणांचा जागीच मृत्यू झाला. 

मृतांमध्ये एका तेरावर्षीय मुलगा असून, चार परदेशी सुरक्षा संघटनांचे सदस्य असल्याची माहिती त्यांनी दिली. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा हल्ला ‘गार्डावर्ल्ड’ नावाच्या खासगी कॅनेडियन सुरक्षा कंपनीच्या वाहनाला लक्ष्य करीत केला होता, अशी माहितीही पोलिसांनी या 
वेळी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: car bomb blast kills twelve afghan capital kabul