esakal | गेल्या वर्षीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण तब्बल ७ टक्क्यांनी कमी झाले
sakal

बोलून बातमी शोधा

Carbon-emissions

कोरोना संसर्गामुळे मानवी आरोग्यावर आणि अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला असला तरी पर्यावरणाला मात्र फायदा झाल्याचे दिसून आले आहे. संसर्गामुळे जगभरात टाळेबंदी जाहीर झाल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद होती. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण तब्बल ७ टक्क्यांनी कमी झाले आहे. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घट असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

गेल्या वर्षीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण तब्बल ७ टक्क्यांनी कमी झाले

sakal_logo
By
पीटीआय

वॉशिंग्टन - कोरोना संसर्गामुळे मानवी आरोग्यावर आणि अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाला असला तरी पर्यावरणाला मात्र फायदा झाल्याचे दिसून आले आहे. संसर्गामुळे जगभरात टाळेबंदी जाहीर झाल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद होती. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण तब्बल ७ टक्क्यांनी कमी झाले आहे. ही आतापर्यंतची सर्वांत मोठी घट असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कार्बन उत्सर्जन मोजणाऱ्या ‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’ या गटाने केलेल्या नोंदणीनुसार, यंदाच्या वर्षात जगभरात ३४ अब्ज मेट्रीक टन कार्बन डायऑक्साइड वातावरणात सोडला गेला. गेल्या वर्षी वातावरणात ३६.४ मेट्रिक टन कार्बन हवेत सोडला गेला होता. संशोधकांच्या म्हणण्यानुसार, टाळेबंदीच्या काळात लोक घरातच थांबल्याने त्यांचा वाहनातून आणि विमानातून होणारा प्रवास अत्यंत कमी झाला. उद्योगही बंद होते.

अमेरिकेकडून Pfizer लशीला हिरवा कंदिल; ट्रम्प म्हणाले, 24 तासांच्या आत दिली जाईल पहिली लस

त्यामुळे ही घट दिसून येत आहे. एकूण कार्बन उत्सर्जनात रस्ते वाहतुकीचा वाटा एक पंचमांश असतो. संसर्गाची परिस्थिती निवळून पुन्हा सर्व व्यवहार पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यावर पुन्हा कार्बन उत्सर्जन वाढेल, असे ‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’ने म्हटले आहे. अर्थात, टाळेबंदी हा प्रदूषण कमी करण्याचा मार्ग नाही, हे शास्त्रज्ञांनाही मान्य आहे. 

चीन लडाखमध्ये वाढवतोय ताकद; सैनिकांना दिले 'आयर्नमॅन सूट'

युरोप-अमेरिकेत या वर्षी कार्बन उत्सर्जनात दहा टक्क्यांहून अधिक घट झाली असताना चीनमध्ये मात्र जेमतेम दीड टक्के घट झाली. चीनमध्ये टाळेबंदी लवकर समाप्त झाली, शिवाय तिथे वाहतुकीपेक्षा उद्योगांतून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण अधिक आहे. टाळेबंदीच्या काळात त्यांच्या उद्योगांवर फारसा परिणाम झाला नाही. 

इराण सरकारने पत्रकाराला दिली फाशी; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Edited By - Prashant Patil

loading image
go to top