चिंताग्रस्त मातांची मुले अतिकृतीशील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

मातेच्या प्रत्येक सवयीचा थेट परिणाम गर्भातील मुलाच्या आरोग्यावर होतो.

टोरोंटो : गर्भवती महिलांना स्वत;च्या आरोग्यासोबतच गर्भामध्ये असलेल्या बाळाची देखील अधिक काळजी घ्यावी लागते. राहण्यापासून खाण्यापर्यंत अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. कारण मातेच्या प्रत्येक सवयीचा थेट परिणाम गर्भातील मुलाच्या आरोग्यावर होतो. एका संस्थेच्या अभ्यासातून  समोर आलेल्या माहितीनुसार सतत चिंतेत राहणा-या महिलांची मुले अतिकृतीशील असू शकतात. 
     
सध्या धावपळीच्या जगात अनेक महिला या नोकरी करत करत घर सांभाळत असतात. त्यामुळे या महिलांना नोकरीसह इतरही चिंता असल्याने त्यांना तणावाचा त्रास दिसून येतो. महिलांमध्ये जास्त, मध्यम आणि कमी प्रमाणात तणावाचा त्रास दिसून येतो आणि त्यानुसारच त्यांच्या मुलांमध्ये देखील अतिकृतीशीलपणा दिसून येत असतो.

मुले पौगंडावस्थेत असताना त्यांच्यात जास्त प्रमाणात अतिकृतीशीलता दिसून येते, असे देखील या अभ्यासात समोर आले आहे. गरोदरपणात महिलांना आपल्या बाळाबद्दल असणारी चिंता हे त्यांच्या तणावामागील मुख्य कारण आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Children of anxious mothers are hyperactive