‘अमेरिकेच्या निवडणुकीत चीन, रशियाचा हस्तक्षेप’

पीटीआय
Sunday, 19 July 2020

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीन आणि रशियाकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाचे संभावित उमेदवार जो बाइडन यांनी शनिवारी केला. निवडणुकीसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी बाइडन यांनी एक डिजिटल कार्यक्रम घेतला.

वॉशिंग्टन - अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चीन आणि रशियाकडून हस्तक्षेप होत असल्याचा आरोप  डेमोक्रॅटिक पक्षाचे संभावित उमेदवार जो बाइडन यांनी शनिवारी केला. निवडणुकीसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी बाइडन यांनी एक डिजिटल कार्यक्रम घेतला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या वेळी त्यांनी हा धक्कादायक आरोप केला. गुप्तचर यंत्रणांकडून याबाबत आपल्याला माहिती मिळाल्याचे सांगत त्यांनी कोणतेही पुरावे देण्यास टाळले.
रशिया आणि चीन या दोन्ही देशांकडून अमेरिकेतील निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप केला जाणार आहे. त्यासाठी दोन्ही देशांकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. व्हाइट हाउस आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदने मात्र बाइडेन यांच्या आरोपांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या वेळी त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही आरोप केले. ट्रम्प डाक विभागाच्या व्यवहारांवर निर्बंध घालू शकतात. त्यामुळे टपाली मतदान होऊ नये, असे ते म्हणाले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China and Russia interfere in US elections