
बीजिंग : भारताच्या सीमेला लागून असलेल्या तिबेटमध्ये ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठे धरण बांधण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे चीन सरकारने आज स्पष्ट केले. तसेच, पूर्ण अभ्यास करून आणि शास्त्रज्ञ व अभ्यासकांबरोबर चर्चा केल्यानंतरच या प्रकल्पाचे नियोजन केले असल्याने भारत आणि बांगलादेश या देशांवर त्याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, अशी ग्वाहीही चीनने दिली आहे. चीननंतर भारत आणि बांगलादेश या देशांमधून ब्रह्मपुत्रा नदी वाहते.