
बीजिंग : ब्रह्मपुत्रा नदीवर तिबेटमध्ये बांधण्यात येणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या धरणाचे काम चीनने सुरू केले असून, हे धरण अरुणाचल प्रदेशात भारताच्या सीमेजवळ आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी १६७.८ अब्ज डॉलरचा खर्च अपेक्षित आहे. चीनचे पंतप्रधान लि कियांग यांनी या प्रकल्पाचे काम सुरू केल्याचे सांगितले असून, त्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजनही केल्याचे सांगितले.