श्रीलंकेत आता चीन उभारणार पायाभूत सुविधा 

रॉयटर्स
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

कोलंबो : श्रीलंकेच्या उत्तर भागात रस्ते आणि घरबांधणीचे प्रकल्प सुरू करून भारताच्या शेजारी देशावर प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न चीनने सुरू केला आहे. अंतर्गत यादवी युद्ध संपून दहा वर्षे झाली, तरीही या भागातील पायाभूत सुविधा अद्याप अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहेत. याचाच फायदा घेत चीनने श्रीलंकेसमोर सहकार्याचा हात पुढे केला आहे. 

कोलंबो : श्रीलंकेच्या उत्तर भागात रस्ते आणि घरबांधणीचे प्रकल्प सुरू करून भारताच्या शेजारी देशावर प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न चीनने सुरू केला आहे. अंतर्गत यादवी युद्ध संपून दहा वर्षे झाली, तरीही या भागातील पायाभूत सुविधा अद्याप अत्यंत प्राथमिक अवस्थेत आहेत. याचाच फायदा घेत चीनने श्रीलंकेसमोर सहकार्याचा हात पुढे केला आहे. 

श्रीलंकेतील दक्षिण भागात चीनने यापूर्वीच प्रकल्प उभारले आहेत. आता उत्तरेतही प्रकल्प सुरू करून संपूर्ण देशावरच प्रभाव पाडण्याची ही चिनी रणनिती असल्याचे मानले जात आहे. 'श्रीलंकेच्या दक्षिण भागात चीनने सुरू केलेल्या बंदराच्या प्रकल्पामुळे हा देश कर्जाच्या ओझ्याखाली गेला आहे', अशी टीका त्या देशातूनच होऊ लागली आहे. 

श्रीलंकेच्या उत्तर भागात तमीळ बंडखोर आणि सरकार यांच्यात 26 वर्षे संघर्ष सुरू होता. या संघर्षामुळे उत्तरेतील पायाभूत सुविधा आणि इतर विकासावर परिणाम झाला. 'या अविकसित भागाची पुनर्बांधणी करण्यासाठी श्रीलंकेच्या सरकारला मदत करण्याची आमची इच्छा आहे', असे चिनी दुतावासातील अधिकारी लुओ चोंग यांनी सांगितले. 'आता या भागात शांतता असल्याने येथे अनेक प्रकल्पांची उभारणी करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी श्रीलंका सरकार आणि स्थानिक तमीळ नागरिकांचे साह्य घेणार आहोत', असेही चीनने सांगितले. 

श्रीलंकेच्या जाफना भागात 40 हजार घरे बांधण्यासाठीच्या शर्यतीत 'चायना रेल्वे इंजिनिअरिंग ग्रुप'ने बाजी मारली. हा 300 अब्जांहून अधिक डॉलर किंमतीचा प्रकल्प आहे. या कंपनीने येथे कॉंक्रिटची घरे बांधण्याची योजना आखली होती. पण कॉंक्रिटऐवजी विटांचे बांधकाम करावे, अशी मागणी स्थानिकांनी केल्यामुळे काही काळ या प्रकल्पाला अडथळा आला होता. चीनच्या उत्तरेत भारताने यापूर्वीच 44 हजार घरे उभारून दिली आहेत. तसेच, पालय विमानतळ आणि एक बंदर याचीही पुनर्बांधणी करण्यासाठी भारताने मदत दिली आहे. 

भारत आणि श्रीलंकेमध्ये प्राचीन संबंध आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत चीनने श्रीलंकेला विविध पातळ्यांवर मदत देऊ करून या देशात प्रभाव तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China to build roads and houses in Sri Lanka