चीन म्हणतंय लस नाही; पण हे औषध कोरोनावर करू शकते मात

vaccine-covid19
vaccine-covid19

चीनने कोरोना विषाणूवर औषध विकसित केले आहे. चीनमधील एका प्रयोगशाळेने असा दावा केला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार, या औषधात करोना विषाणूला रोखण्याची क्षमता असल्याचे म्हंटले आहे. 

चीनमध्ये असणाऱ्या पेकिंग यूनिवर्सिटीमध्ये कोरोना विषाणूवर संशोधन सुरु आहे. या यूनिवर्सिटी मधील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूला रोखणारे औषध विकसित करण्यात आले असून, यामुळे संसर्ग झालेल्या रुग्णाला बरे होण्यासाठी लागणारा कालावधी कमी तर होतोच शिवाय रुग्णाची प्रतिकार शक्ती देखील वाढते. बीजिंग ऍडवान्सड इनोवेशन सेंटर फॉर जियोनॉमिक्सचे संचालक संने झी यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, प्राण्यांवर केलेल्या परीक्षणावर हे औषध सफल झाल्याचे म्हंटले आहे. हे औषध शरीरातील एंटीबॉडीचा उपयोग करून प्रतिकार शक्ती विकसित करते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याआधी ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील इन्स्टिट्यूटने देखील करोना विषाणूवर संशोधन करत लस विकसित केली असल्याचे म्हंटले होते. या लसचा मानवावर प्रयोग सुरु केल्याचा दावा ऑक्सफर्ड विद्यापीठाकडून करण्यात आला होता. तर इस्राएलच्या संरक्षण खात्याने देखील करोना लस शोधल्याचे म्हंटले होते.

दरम्यान, कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात सर्वांनाच जेरीस आणले आहे. चीनच्या वुहान शहरातील उद्रेकानंतर करोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात सर्वांनाच जेरीस आणले आहे. आत्तापर्यंत संपूर्ण जगभरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जवळ जवळ ५० लाखांवर पोहचली आहे. तर या विषाणूच्या संसर्गाने ३ लाख २३ हजार ३५० जणांचा जीव घेतला आहे. तर साऱ्या जगाचे अर्थकारण मागील दोन ते तीन महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प आहे. जाणकारांच्या मते कोरोना विषाणूच्या संसर्गाने झालेले नुकसान १९२९ तसेच २००८ साली आलेल्या जागतिक महामंदीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे सर्वच देश आपापल्या परीने या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बहुतेक करून सर्वच देश कोरोना विषाणूवर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com