चीनच्या विकासाचा गाडा रुतला

आर्थिक दरात २.६ टक्क्यांची घट; सरकारची कबुली, क्रयशक्तीत ही घट
China development stalled decline in economic rate Chinese government
China development stalled decline in economic rate Chinese governmentsakal

बीजिंग : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूच्या उगमाबद्दलचा दावा सातत्याने फेटाळत असलेला चीन लॉकडाउन काळात देशात घसरलेल्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त करीत आहे. ताज्या आर्थिक आकडेवारीनुसार चीनमधील अर्थव्यवस्था २.६ टक्क्यांनी खालावली आहे. जगात चीनमध्ये २०२२ मध्ये प्रथम कोरोनाचा प्रसार झाला. त्यानंतर जाहीर झालेल्या लॉकडाउनमुळे येथील अर्थव्यवस्था खालावल्याची कबुली चीन सरकारने अडीच वर्षांनंतर दिली आहे. शांघाय व अन्य शहरांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावाने सर्व बंद ठेवण्यात आल्याने गेल्या तिमाहीपेक्षा यावर्षी जूनपर्यंत संपलेल्या तीन महिन्यांत चीनला आर्थिक पातळीवर दणका बसला आहे. पण आता सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने आर्थिक क्षेत्रात एकसारखी सुधारणा होत आहे, असा दावा चीन सरकारने केला आहे.

चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने गुरुवारी (ता.१४) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीनी अर्थव्यवस्था २.६ टक्क्यांनी घटली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी यंदा मार्च व एप्रिलमध्ये शांघाय व अन्य काही शहरांमध्ये कठोर लॉकडाउन होता. यावेळी सर्व उद्योग बंद होते. लोकांना घरातच थांबाबे लागले होते. या काळात चीनचा आर्थिक वेग पहिल्या तिमाहीत ०.४ टक्क्यांपर्यंत मंदावला. आधीच्या तिमाहीत तो ४.८ टक्के होता. जगातील सर्वांत व्यग्र बंदर असलेल्या शांघायमध्ये सर्व व्यवहार ठप्प पडल्याने जागतिक व्यापार व उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. लाखो लोक घरात बंदिस्त होते. त्यामुळे क्रयशक्तीत घट झाली आहे.

कारखाने व कार्यालये मेमध्ये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी सर्व काही नियमित होण्यासाठी काही आठवडे किंवा महिने लागू शकतात, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. चीनशी व्यापारी संबंध असलेल्या देशांना पुढील काही महिन्यांत वाहतूक विस्कळित झाल्याचे जाणवेल, असेही त्यांनी म्हटले आहे. चीनमधील मंदावलेल्या अर्थव्यवस्थेमुळे तेल, अन्नधान्य व गृहपयोगी वस्तूंची आयात घटणे आणि परदेशी बाजारपेठेत उत्पादनांच्या वाहतुकीत अडथळा निर्माण होणे, अशा समस्या या देशांना भेडसावतील.

अंदाजकर्त्यांचे म्हणणे...

  • कर परतावा, कंपन्यांसाठी भाडेमाफी व अन्य मदत अशा सवलती दिल्या जात असल्या तरी यंदा ५.५ टक्के विकासाचे सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे स्वप्न पूर्ण होणे अवघड

  • मोठे-मोठे खर्च करण्याऐवजी चीन अत्यंत सावधपणे पावले उचलत आहे. यातून परिणाम दर्शविण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो

  • जास्त खर्चामुळे घरांच्या किमती व उद्योजकांचे कर्ज वाढण्याची चिंता चिनी नेत्यांना वाटत आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com