मध्यरात्री कोरोनाबाधितांवर जबरदस्ती, मेटल बॉक्समध्ये केलं कैद | China Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

china corona

मेटल बॉक्समध्ये कोरोनाबाधितांना केले कैद, भितीने नागरिकांचे पलायन

चीनचे (china) अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहेत. चीनने येथे कोरोनाबाबत (coronavirus) कडक निर्बंध (restictions) घातले आहेत, याच निर्बंधांच्या नावाखाली तो आपल्या नागरिकांशी कशी वागणूक देत आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. चीनकडून अशाप्रकारे नागरिकांना वागणूक दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्धांनाही केले मेटल बॉक्समध्ये कैद

चीन आपल्या 'झिरो कोविड पॉलिसी' अंतर्गत आपल्याच नागरिकांना कॉर्टीन कॅम्पमध्ये ठेवण्याऐवजी धातूच्या पेटीत बंद करत आहे. अशा प्रकारची वाईट वागणूक सध्या नागरिकांना देण्यात येत आहे. नागरिकांशी अशा प्रकारच्या वागणुकीची हद्द इथेच संपत नाही. चीनमध्ये गरोदर महिला, लहान मुले आणि वृद्धांनाही या धातूच्या पेट्यांमध्ये ठेवले जात आहे. कोविडची लागण झाल्यास त्यांना दोन आठवडे या पेट्यांमध्ये कैद केले जाते.

हेही वाचा: भाजपमध्ये गेले तरी मला त्यांची चिंता नव्हती - शरद पवार

धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

संसर्ग झाल्यानंतर अनेक भागातील लोकांना मध्यरात्री घरातून उचलून या धातूच्या पेट्यांमध्ये बंद करण्यात आले. video मध्ये दिसत आहे, चिनी नागरिकांना मध्यरात्री घराबाहेर पडण्यास भाग पाडले जात आहे. पुढील महिन्यात चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिकचे आयोजन केले जाणार आहे, त्यामुळे चीननेही अशी कठोर भूमिका स्वीकारली आहे, मात्र या प्रकारची वागणूक खरोखरच लाजिरवाणी आहे.

हेही वाचा: दाऊद इब्राहिमचा पुतण्या मुंबई पोलिसांच्या हातून निसटला, गाठलं पाकिस्तान

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top