चीनच्या आकाशात 'तीन चाँद'; कृत्रिम चंद्राद्वारे शहरे उजळविणार 

moon
moon

बीजिंग : मानवाला चंद्रावर पाठविण्याचे स्वप्न अनेक देश बघत असतात. अमेरिका व रशियासारख्या बलाढ्य देशांनी ते साध्यही केले आहे. पण आता चीन कृत्रिम चंद्रच अंतराळात पाठविणार आहे. हे वृत्त येथील माध्यमाध्यमांनी दिले आहे. 

खेळ, तंत्रज्ञानानंतर चीन आता विज्ञानातही लवकरच आगळा प्रयोग करणार आहे. चीनमधील शहरी भागात विजेचे दर कमी करणे आणि रस्त्यांवरील दिव्यांवरील अवलंबित्व संपवण्यासाठी चीनने कृत्रिम चंद्राची मोहीम आखली आहे. नैर्ऋत्येकडील सिचुआन प्रांतातील चेंगडू शहरात चंद्ररूपी प्रकाशमान उपग्रह विकसित करण्यात येत आहे. तो खऱ्या चंद्रासारखा कलेनुसार चमकदार असेल, शिवाय तो चंद्रापेक्षा आठपटीने प्रकाशमान असेल, असा दावा एका चिनी वृत्तपत्राने दिला आहे. 

मानवनिर्मित या पहिल्या चंद्र उड्डाण सिचुआनमधील छिचॉंग उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून होणार आहे. पहिली कृत्रिम चांद्र मोहीम 2020 पर्यंत प्रत्यक्षात येणार आहे. हा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यास 2022 पर्यंत आणखी दोन कृत्रिम चंद्र आकाशात सोडण्याचा चीनचा संकल्प असल्याचे टायन फु न्यू एरिया सायन्स सोसायटीचे प्रमुख वु चुनफेंग यांनी ही माहिती दिली. या मोहिमेची जबाबदारी या संघटनेकडे आहे. पहिली मोहीम ही प्रायोगिक तत्त्वावर असली, तरी 2022 मध्ये या उपग्रहांचा नागरी व व्यावसायिक उद्दिष्टांसाठी प्रत्यक्षात करण्यात येईल, असे त्यांनी "चायना डेली'शी बोलताना सांगितले. 

सूर्याचा प्रकाश परावर्तित करून या उपग्रहाद्वारे शहरी भागातील रस्त्यांवरील दिवे बदलण्यात येणार आहे. मानवनिर्मित चंद्रामुळे 50 चौरस किलोमीटर भूभाग रात्री उजळून निघाला तर दरवर्षी विजेवरील खर्चात 17 कोटी डॉलरची बचत होईल. 

रशियाकडून प्रयत्न 
सूर्यप्रकाश परावर्तित करून पुन्हा पृथ्वीवर आणण्याचा प्रयोग करणारा चीन हा पहिलाच देश नाही. या आधी 1990मध्ये रशियाच्या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला होता. त्यासाठी महाकाय आरशांचा वापर करून अंतराळातून पृथ्वीवर प्रकाश परावर्तित करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रायोगिक प्रकल्पाला "नामया' किंवा "बानेर' असे नाव दिले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com