China News : आंतरराष्ट्रीय मध्यस्थ संघटना स्थापन; चीनचा पुढाकार, पाकिस्तानसह तीसहून अधिक देश सदस्य

Global Dispute Resolution : चीनने अमेरिका वर्चस्वाच्या जागतिक संस्थांना पर्याय म्हणून आंतरराष्ट्रीय मध्यस्थ संघटनेची स्थापना केली असून, पाकिस्तानसह तीसहून अधिक देश या नव्या संघटनेचे सदस्य बनले आहेत. सामोपचाराने वाद मिटवणे हा संघटनेचा उद्देश आहे.
China News
China News sakal
Updated on

हाँगकाँग : अमेरिकेचा प्रभाव असलेल्या संस्था-संघटनांचे वर्चस्व नाकारणाऱ्या चीनने इतर तीस देशांना बरोबर घेत आंतरराष्ट्रीय मध्यस्थ संघटनेची (आयओएम) स्थापना केली आहे. वाद असलेल्या देशांमध्ये मध्यस्थी करत सामोपचाराने तोडगा काढण्याचा या संघटनेचा उद्देश असल्याचे चीनच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. चीनसह पाकिस्तान, इंडोनेशिया, बेलारूस आणि क्युबासह तीसहून अधिक देशांनी याबाबतच्या करारावर आज सही केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com