China military training is preparation for attack | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chin

चीनचा युद्धसराव ही आक्रमणाचीच तयारी

तैपेई : तैवानच्या जवळ गेल्या आठवड्यापासून चीनने सुरु केलेला युद्धसराव म्हणजे आमच्यावर आक्रमण करण्याची पूर्वतयारी आहे, असा दावा तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वु यांनी आज केला. चीनच्या आक्रमणाचा सामना करण्यासाठी तैवाननेही लष्करी सरावाला आजपासून सुरुवात केली आहे.

अमेरिकेच्या लोकप्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यानंतर तणाव वाढला आहे. चीननेही मोठ्या प्रमाणावर युद्धसराव सुरु करत दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर जोसेफ वु यांनी आज पत्रकार परिषद घेत चीनवर टीका केली. ‘प्रशांत महासागरावर वर्चस्व मिळविण्याचा आणि तैवानचे विलीनीकरण करून घेण्याचा चीनचा उद्देश आहे. त्याद्वारे दक्षिण आणि पूर्व चिनी समुद्रावरही नियंत्रण मिळवून तैवानला मदत करण्यापासून अमेरिका आणि इतर देशांना रोखण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.