Corona Virus : चीनमध्ये भीषण परिस्थिती! बीजिंग पोलिसांचं स्मशानभूमीला संरक्षण; आकडे जाणून घ्या

Corona Virus in China
Corona Virus in Chinaesakal

Beijing China : चीनमध्ये सध्या कोरोनाने कहर केलाय. वाढते मृत्यू हाताळणं प्रशासनाला जड जात आहे. त्यामुळे यंत्रणांमार्फत सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करीत असल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत.

चीनची राजधानी असलेल्या बीजिंग येथील स्मशानभूमीच्या बाहेर पोलिस आणि सुरक्षारक्षक तैनात करण्यात आलेले आहेत. चीन सरकार कोरोनाची परिस्थिती जगापासून लपवून ठेण्याचा प्रयत्न करीत असल्याचं बोललं जात आहे. स्मशानभूमी परिसरात पोहोचलेल्या पत्रकारांना सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्कीदेखील केली.

Corona Virus in China
Maharashtra Winter Session 2022 : ऊर्जामंत्री बोलत असतांनाच सभागृहाची बत्तीगुल! रोहित पवारांनी काढले वाभाडे

यादरम्यान, स्मशानभूमीमध्ये गंभीर दृष्य पहायला मिळाली आहेत. साधारण एक डझन काळ्या मिनिव्हॅन्स रांगेत उभ्या होत्या. तिथे अंत्यसंस्काराची तयारी सुरु असल्याचं दिसून येत होतं. शिवाय एका व्हॅनमधून मृतदेह खाली घेत असल्याचं दिसलं आणि शोक करणारे नातेवाईकही तिथे होते.

'फायनान्शिअल टाईम्स आणि वॉल स्ट्रीट जर्नल'ला तेथील कामगारांनी काही माहिती पुरवली. त्यावरुन चीन सरकारने कोविड निर्बंध रद्द केल्यामुळे कोरोना रुग्ण वाढत असल्याचं दिसून येतंय. मुळात प्रशासनाकडून पुरविल्या जात असलेल्या आकडेवारीवरुन मागच्या आठवड्यात केवळ दोन कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आली.

स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दररोज सुमारे २०० मृतदेह अंत्यविधीसाठी येतात. बीजिंगमधील नियुक्त स्मशानभूमीमध्ये बुधवारी ३० मृतदेह अंत्यविधीसाठी आल्याचं सांगण्यात येतंय. एकीकडे चीन झीरो कोविड धोरण राबवत असतांना परिस्थिती मात्र विपरित असल्याचं दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com