esakal | चंद्रावर आता संशोधन केंद्र; चीन आणि रशियाचा संयुक्त प्रकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

Moon

चंद्राच्या अभ्यासासाठी संयुक्त संशोधन केंद्र उभारणार असल्याचे चीन आणि रशियाने आज जाहीर केले. हे संशोधन केंद्र शक्यतो चंद्राच्या पृष्ठभागावरच उभारले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. चीन आणि रशियादरम्यानच्या अवकाश क्षेत्रातील सहकार्याची ही नवी सुरुवात समजली जात आहे.

चंद्रावर आता संशोधन केंद्र; चीन आणि रशियाचा संयुक्त प्रकल्प

sakal_logo
By
पीटीआय

बीजिंग - चंद्राच्या अभ्यासासाठी संयुक्त संशोधन केंद्र उभारणार असल्याचे चीन आणि रशियाने आज जाहीर केले. हे संशोधन केंद्र शक्यतो चंद्राच्या पृष्ठभागावरच उभारले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. चीन आणि रशियादरम्यानच्या अवकाश क्षेत्रातील सहकार्याची ही नवी सुरुवात समजली जात आहे. चीनच्या चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने (सीएनएसए) संकेतस्थळावर निवेदन प्रसिद्ध करत आंतरराष्ट्रीय चांद्र संशोधन केंद्राबाबत घोषणा केली आहे. ‘सीएनएसए’ आणि रशियाची अवकाश संशोधन संस्था ‘रॉसकॉसमॉस’ यांच्यात याबाबत नुकताच करार झाला. या केंद्राचा वापर इतरही देशांना करता येईल, असे चीनने म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्थात, हे संशोधन केंद्र उभारणीसाठीचा कालावधी मात्र दोन्ही देशांनी जाहीर केलेला नाही. हे केंद्र चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा त्याच्या कक्षेत उभारले जाऊ शकते. या संशोधन केंद्राद्वारे चंद्राचे निरीक्षण, नव्या जागांचा शोध, अनेक मूलभूत संशोधन आणि उपकरणांची चाचणी असे विविध प्रयोग केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

अवकाश क्षेत्रातील चीनच्या प्रवेशावेळी त्यांनी रशियाची मोठी मदत घेतली होती. २००३ मध्ये अवकाशात अंतराळवीरांना सोडण्याच्या मोहिमेनंतर मात्र त्यांनी या क्षेत्रात वेगाने प्रगती केली आहे. चीनने ‘नासा’ वगळता जगातील अनेक अवकाश संस्थांबरोबर काम केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चीनच्या चार मोहिमा
गेल्या काही काळात अमेरिका, चीन, भारत आणि इतर काही देशांच्या अवकाश मोहिमांच्या तुलनेत रशियाच्या अवकाश कार्यक्रमात फार विशेष घडामोडी दिसल्या नाहीत. बऱ्याच विलंबानंतर रशियाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंगारा ए-५ रॉकेटचे उड्डाण केले होते. चीनच्या मात्र या वर्षांत चार मानवी मोहिमा आहेत. चीन अवकाशात त्यांचे अवकाश स्थानक उभारणार असून त्यासाठी ही तयारी आहे. चीनने दोन प्रायोगिक अवकाश स्थानके आधीच सुरु केली आहेत.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top