गलवानबाबत चीनची लपवाछपवी ; ‘द क्लॅक्सॉन’ चा दावा

ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्राकडून माहिती उघड, ३८ सैनिक वाहून गेल्याचा दावा
galwan vally
galwan vallyadmin

कॅनबेरा : गलवान खोऱ्यात (Galwan vally)जून २०२० मध्ये भारताबरोबर झालेल्या संघर्षावेळी चीनचे चार नाही, तर ३८ सैनिकांचा मृत्यू झाला होता आणि ही माहिती चीनने दडवून ठेवली आहे, असा दावा ऑस्ट्रेलियातील ‘द क्लॅक्सॉन’(The Klaxon) या वृत्तपत्राने केला आहे. संघर्षावेळी चीनचे ३८ सैनिक नदीत वाहून गेले होते, असे याबाबतच्या ‘गलवान डिकोडेड’ या अहवालात म्हटले आहे.

भारताचे जवान आणि चीनच्या सैनिकांमध्ये १५ जून २०२० च्या रात्री गलवानमध्ये झटापट झाली होती. या संघर्षात भारताचे वीस जवान हुतात्मा झाले होते, तर चार सैनिकांचा मृत्यू झाल्याचे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने कबूल केले होते. वास्तविक, गलवान खोऱ्यातील नदी अंधारात आणि अत्यंत थंड वातावरणात ओलांडत असताना पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ३८ सैनिक वाहून गेले होते, असा दावा ‘द क्लॅक्सॉन’ने दिलेल्या वृत्तात करण्यात आला आहे. सोशल मीडियाद्वारे घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या एका गटाने वर्षभराच्या संशोधनानंतर हा अहवाल तयार केला आहे. चीनमधील ‘वेईबो’ या सोशल मीडियावरील पोस्टचा त्यांनी अभ्यास केला. गलवान खोऱ्यात ३८ चिनी सैनिक वाहून गेल्याचा उल्लेख अनेक जणांनी त्यांच्या पोस्टमध्ये केला आहे. याआधीही विदेशी माध्यमांनी अशा प्रकारचे दावे केले आहेत. चीनने मात्र अधिकृतपणे केवळ चारच जणांचा मृत्यू झाल्याचे आणि त्यापैकी एकच जण वाहून गेल्याचे कबूल केले होते. संशोधकांच्या गटाने केलेल्या अभ्यासानंतर चीनचा दावा चुकीचा असल्याचे निदर्शनास येत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, गलवानमधील संघर्षानंतर चीनमधील ‘वेईबो’वर अनेक नागरिकांनी या घटनेबाबत सविस्तर चर्चा केली होती. संशोधक गटाने चिनी अधिकाऱ्यांनी इंटरनेटवरून काढून टाकलेल्या वृत्तांचाही अभ्यास केला आणि चीनमध्ये राहणाऱ्या नागरिकांबरोबरही थेट संवाद साधला होता. त्यातून मिळालेल्या माहितीचा आधार घेत अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच, चिनी माध्यमांमध्ये आधी प्रसिद्ध झालेल्या आणि नंतर डिलीट केलेल्या व्हिडिओचा पुरावाही अहवालाबरोबर जोडण्यात आला आहे.

अशी झाली झटापट

अहवालानुसार, गलवानमध्ये दोन्ही देशांनी मान्य केलेल्या बफर झोनमध्ये चिनी सैनिकांनी बेकायदा बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी भारतीय जवानांनी तात्पुरता पूल बांधला. हा पूल पाडण्यासाठी १८० चिनी सैनिक आले होते. त्यावेळी भारतीय जवान आणि त्यांच्यात सहा जून २०२० या दिवशी झटापट झाली. यानंतर आपापली बांधकामे पाडण्याचे ठरले. मात्र, चिनी सैनिकांनी गोपनीय पद्धतीने भारताने बांधलेला पूल तोडला. त्यानंतर १५ जूनला कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जवान गलवान खोऱ्यात गेले आणि त्यांनी चिनी बांधकाम पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पुन्हा झटापट झाली. यात चिनी सैनिकांना चांगलाच मार खावा लागल्याने ते माघारी फिरले. यावेळी घाईगडबडीत नदी ओलांडताना वेगवान प्रवाहात ३८ चिनी सैनिक वाहून गेले, असा दावा अहवालात करण्यात आला आहे.

‘गलवान डिकोडेड’मधील दावे

  • गलवान खोऱ्यात चीनचे मोठे नुकसान

  • या घटनेबाबतची सोशल मीडिया आणि इंटरनेटवरील माहिती चीन सरकारने काढून टाकली

  • बफर झोनमध्ये चीनकडून बेकायदा बांधकाम

  • भारतीय जवानांबरोबर झालेल्या झटापटीत मार खाल्ल्यानंतर परतताना चिनी सैनिक वाहून गेले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com