Covid 19: चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असतानाच अचनाक लिंबूच्या विक्रीत मोठी वाढ; नेमकं कारण काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid 19

Covid 19: चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असतानाच अचनाक लिंबूच्या विक्रीत मोठी वाढ; नेमकं कारण काय?

जगात कोरोना महामारीचा केंद्रबिंदू ठरलेल्या चीनमध्ये कोरोना महामारीने पुन्हा एकदा थैमान घातलं आहे. चीनमधील परिस्थिती पुन्हा एकदा इतकी भीषण झाली आहे की, रुग्णांना उपचारासाठी ठेवण्यासाठी बेड उपलब्ध नाहीत, मृतांना जाळण्यासाठी जागाही मिळत नाही. मृत व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी 24 तास वाट पाहावी लागत आहे. अशातच चीनमध्ये अचानक लिंबूच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोना महामारीच्या दरम्यान चीनमधील लोक आता संसर्गाशी लढण्यासाठी नैसर्गिक उपायांचा अवलंब करत आहेत. चीनमध्ये लिंबू, आणि नाशपातीच्या विक्रीत वाढ होत आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लोक लिंबूचे भरपूर सेवन करू लागले आहेत.

बीजिंग आणि शांघाय ज्या ठिकाणी कोविडचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्या दोन शहरांमधून लिंबाच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी वाढण्याचे नोंदवण्यात आले आहे.

हेही वाचा: Corona BF.7 Variant: लोकसभेत सर्वांना मास्क बंधनकारक

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, लोक त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी समृद्ध अन्न खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करत आहेत. त्याचबरोबर, व्हिटॅमिन सी कोरोनाव्हायरस बरा करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते याबाबत खात्रीशीर माहिती समोर आलेली नाही.

हेही वाचा: Covid-19 Lockdown : कोरोना रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लावावा का? पाहा जनता काय म्हणते?

देशामध्ये पिवळ्या पीचलाही जास्त मागणी आहे, कारण काही चिनी लोकांचा असा विश्वास आहे की ते भूक वाढवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर लिंबू आणि काही व्हिटॅमिन सी समृध्द फळांव्यतिरिक्त, चीनमध्ये ताप, वेदनाशामक आणि फ्लूवरील औषधांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे.

तर कठोर निर्बंध संपल्यानंतर चीनमध्ये कोविड संसर्गामध्ये वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जपान, दक्षिण कोरिया आणि युनायटेड स्टेट्स सारख्या देशांमध्ये अलिकडच्या दिवसांत संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

हेही वाचा: Corona Virus: कोरोना पुन्हा येतोय! आताच घरी आणा हे मेडिकल गॅजेट्स, ऐनवेळी होईल खूपच उपयोग

टॅग्स :Chinacovid19lemon tea