esakal | चीनची ५६ फायटर विमानं घुसली तैवानमध्ये | China
sakal

बोलून बातमी शोधा

चीनची ५६ फायटर विमानं घुसली तैवानमध्ये

चीनची ५६ फायटर विमानं घुसली तैवानमध्ये

sakal_logo
By
दीनानाथ परब

तैपेई: भारताप्रमाणेच चीनचे तैवान (China-Taiwan) बरोबरही तीव्र मतभेद आहेत. तैवानवर धाक निर्माण करण्यासाठी चीन वारंवार शक्तीप्रदर्शन करत असतो. चीन सध्या हवाई हद्दीचे उल्लंघन करुन तैवानच्या हवाई क्षेत्रात (Air space) घुसखोरी करत आहे. सोमवारी चीनच्या ५६ फायटर विमानांनी (fighter jets) तैवान एअर डिफेन्स झोनमध्ये घुसखोरी केली होती. अशा प्रकारची बेजबाबदार चिथावणीखोर (provocative) कृती करणं आता बंद करा, अशा शब्दात तैवानने चीनला सुनावलं आहे.

चीनची ३६ फायटर जेट्स, अण्वस्त्र हल्ला करणारी १२ बॉम्बर H-6 विमाने आणि अन्य चार विमानांनी सोमवारी तैवानच्या दक्षिण पश्चिम एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोनमध्ये घुसखोरी केली होती. चीनच्या या कृतीनंतर आपणही तयार असल्याचा इशारा तैवानने दिला आहे. रात्रीच्यावेळी आणखी चार विमाने झोनमध्ये आली होती. एकूण ५६ विमांनानी हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

हेही वाचा: "आम्हाला गोव्यात ड्रग्ज घेणारी लोकं नकोत"

चीन तैवान स्ट्रेटमधील जैसे थे स्थिती बदलून शांतता आणि स्थिरता बिघडवत आहे, असा आरोप तैवानच्या मेनलँड अफेअर्स काऊन्सिलने केला आहे. MAC ही तैवानची चीन बद्दलचं धोरण निश्चित करणारी समिती आहे. "चीन दोन देशांमध्ये तणाव निर्माण करतोय तसेच प्रादेशिक सुरक्षेला धोका निर्माण करतोय. तैवान अजिबात तडजोड करणार नाही आणि शरण जाणार नाही" असे, MAC चे प्रवक्ते चिऊ चुई-चेंग यांनी म्हटले आहे.

loading image
go to top