चीनची दादागिरी वाढतीये; 'अरुणाचल'जवळ वसवली 3 गावे 

china1
china1

नवी दिल्ली- चीनने सीमा भागात कमीतकमी 3 गावे वसवली असल्याचं स्पष्ट होतं आहे. ही गावे बुम ला पास पासून 5 किलोमीटर अंतरावर असून अरुणाचल प्रदेशजवळ भारत-चीन-भूतानच्या ट्राय-जंक्शनदरम्यान ही गावे पडतात. चीनने याआधीच अरुणाचल प्रदेशवर आपला ताबा सांगितला आहे. आता या भागातमध्ये नवीन बांधकाम करुन गावे वसवणे एक मोठं पाऊल असल्याचं सांगितलं जातं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

चीन एका योजनेतहत हान चायनिज आणि कम्युनिस्ट पक्षाच्या सदस्यांना भारत-चीन सीमेलगत आणत आहे. यामुळे आपला या भागावरचा दावा चीन मजबूत करु पाहात आहे, असं डॉ. ब्रह्मा चेलेनी म्हणाले आहेत. नव्या भागांवर ताबा सांगण्यासाठी चीन नागरी वस्तींचा फायदा घेऊ पाहात आहे. शिवाय चीन या माध्यमातून हिमालय भागात घुसखोरी करु पाहात आहे. 

सॅटेलाईट इमेजनुजार चीन गाव वसवण्यासाठी मोठे बांधकाम करत आहे. विशेष म्हणजे भारत आणि चीनचे सैनिक पूर्व लडाखच्या भागात आमनेसामने असताना, चीनकडून हे बांधकाम होत आहे. भारत आणि चीनमधील संबंध सर्वाधिक तणाच्याच्या स्थितीतून जात आहे. 1962 च्या युद्धानंतर प्रथमच भारत-चीन सीमेवर मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. 

पुढील महिन्यापासून CAA कायदा लागू होऊ शकतो, भाजप नेत्याने दिली माहिती

15 जून रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. त्यात उभय देशांच्या सैनिकांनी प्राण गमावला. तेव्हापासून सीमाभागात जवळजवळ 10 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. वाद शमवण्यासाठी भारत चीनसोबत चर्चा करत आहे. पण, चर्चेच्या आठव्या फेरीनंतरही कोणता तोडगा निघू शकलेला नाही. 

प्लॅनेट लॅबने दिलेल्या रिपोर्टनुसार, चीनने 17 फेब्रुवारी 2020 मध्ये पहिले गाव वसवले. या वस्तीमध्ये 20 पेक्षा अधिक स्ट्रक्चर्स दिसत होते. 28 नोव्हेंबर 2020 मध्ये घेतलेल्या इमेजेसमध्ये कमीतकमी 50 स्ट्रकचर्स बांधल्याचं दिसून येत आहे. तिन्ही गावे एकमेकांपासून 1 किलोमीटरच्या अंतरावर वसवण्यात आले आहेत. शिवाय या गावांना जोडण्यासाठी पक्का रस्ता बांधण्यात आला आहे. दरम्यान, चीनने भारताचा 65,000 चौ.किमीचा भाग आपल्या नकाशामध्ये दाखवला असून हा दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा केला आहे. भारताने चीनचा दावा फेटाळून लावला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com