Karachi Blast : 'तत्काळ कारवाई करा', चीनने पाकिस्तानला सुनावले

Karachi Blast
Karachi Blaste sakal

कराची विद्यापीठावर आत्मघाती हल्ला (Karachi Bomblast) करण्यात आला. यामध्ये चार चिनी नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी बीएलए या दहशतवादी गटाने घेतली आहे. त्यानंतर चीनने पाकिस्तानला (Pakistan) सुनावले असून देशातील चिनी (China) प्रकल्पांवर आणि जवानांवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांविरोधात तत्काळ कारवाई करण्याची आणि समस्येचे मूळ कारण सोडविण्याची मागणी केली आहे.

Karachi Blast
पर्म विद्यापीठावर दहशतवादी हल्ला ते मुश्रीफांचा दुसरा घोटाळा १०० कोटींचा

"पाकिस्तानमधील चिनी संस्था, प्रकल्प आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानी बाजूने अधिक प्रयत्न करावेत आणि चिनी लोकांना दुखावण्याचा प्रयत्न करणार्‍या संघटनांना हे समजावून सांगावे'', अशी मागणी चीनने केली आहे. याबाबत ग्लोबल टाइम्सने वृत्त दिले आहे.

बीएलए हा पाकिस्तानमधील अधिक सक्रिय फुटीरतावादी गटांपैकी एक आहे. आम्हाला आमचे हक्क मिळत नाही, असं कारण देत हा गट नेहमी वेगळ्या प्रांताची मागणी करतो. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा प्रांत आहे. देशातील सर्वात मोठे नैसर्गिक वायू, सोनं आणि इतर खनिजांचे साठे या भागात आहेत. पण, या प्रांतात चीनच्या वाढत्या प्रभावाला येथील फुटीरतावादी गटाचा विरोध आहे. या भागातील चिनी प्रकल्पांमध्ये अरबी समुद्रातून तेलाची वाहतूक करण्यासाठी महत्वाचा असलेल्या ग्वादर बंदाराचा देखील समावेश होते. बीएलएने दावा केलेल्या ऑपरेशनमध्ये गेल्या वर्षी त्यांनी चिनी अभियंत्यांवर देखील हल्ला केला होता. कराचीमधील दूतावासावर २०१८ मध्ये हल्ला झाला होता. हा हल्ला देखील बीएलएने केल्याचा दावा केला आहे. चिनी नागरिकांशी संबंधित अनेक दहशतवादी हल्ले या गटाशी निगडीत आहेत. पाकिस्तानने अलिकडच्या काळात संरक्षणामध्ये वाढ केली आहे. तरीही हल्ले होत आहे.

दरम्यान, शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यापासून मंगळवारी झालेला स्फोट हा आतापर्यंत सर्वात मोठा हल्ला होता. हा दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला आहे, असं शरीफ यांनी म्हटलं असून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दुसरीकडे चीनने आपल्या नागरिकांना गरजेशिवाय बाहेर पडू नका अशा सूचना दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com