China-Taiwan Tension : ड्रॅगनच्या सैन्याचा तैवानला घेराव, समुद्रातही युद्धनौका दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

China Sends Jets Into Taiwan

China-Taiwan Tension : ड्रॅगनच्या सैन्याचा तैवानला घेराव, समुद्रातही युद्धनौका दाखल

अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर चीनने तैवान बेटाच्या सभोवताली सैनिकी युद्धसरावावा सुरुवात केली आहे. केवळ तैवानच्या समुद्रातच नाही तर हवाई क्षेत्रात देखील चीनने आपल्या हवाई दलाला तैनात केलं आहे. नॅन्सी पेलोसी यांच्या भेटीला चीनने विरोध केला होता. तैवानला धडकी भरेल असा युद्धसराव सुरु आहे.

फायटर जेट , युद्धनौका तर केवळ २ मैल अंतरावर असणार आहे. साऊथ चायना सी South china sea (दक्षिण चीनी समुद्र) वर आपलं वर्चस्व गाजविण्यासाठी चीन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे . चीन तैवानवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या महायुद्धात चीन आणि तैवान यांच्यात फूट पडली होती. चीनपासून अगदी १०० मैलांवर वसलेला तैवान एक बेट आहे. साउथ चायना सी हा आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही खूप महत्वाचा मानला जातो.

अमेरिकेने तैवानला आपला पाठिंबा दिलाय. तसंच अमेरिकी संसदेच्या सभापती नॅन्सी पेलोसिंच्या भेटीमुळे चीन आणि अमेरिका यांच्यात जुंपली आहे. चीनने नॅन्सी पेलोसिंनी तैवानला भेट देऊ नये असं बजावलं होतं.

हेही वाचा: चीन-तैवान वाद : जिनपिंग यांनी अमेरिकेला बजावले; आगीशी खेळू नका

7 ऑगस्टपर्यंत तैवानच्या सभोवताली चीनी सेना युद्धसराव करणार आहे. चीनने तैवानच्या हवाई क्षेत्रातून यात्री विमानांवर बंदी घातलीय. नॅन्ली पेलोसी यांचा दौरा संपत नाही तोवरच चीनने २७ फायटर जेट तैवानच्या हद्दीत दाखल झाले होते. यामुळे तैवान आणि चीनदरम्यान युद्धपरिस्थिती निर्माण होतेय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र अमेरिकेने तैवानला पूर्ण पाठींबा दिला होता. या स्थितीत अमेरिका नेमंके काय पाऊल उचलतेय हे पहावं लागेल

न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार , यापूर्वी देखील चीनने युद्धसराव तैवानच्या सीमेलगत केला होता. मात्र आताचा सराव हा तैवानच्या सीमारेषेच्या आत आहे. ''ही स्थिती पाहता तैवानला खूप मोठा धोका आहे. ते अगदीच आमच्या देशाच्या वेशीवर आहेत. हा सष्करी सराव त्यांना घुसखोरी आणि हल्ला करण्यासाठी फायद्याचा ठरेल '' अशी भीती ,तैवानच्या हवाई दलाचे निवृत्त डेप्यूटी कमांडर चांग-यान-टींग यांनी व्यक्त केलीय

Web Title: China Taiwan Tension China Started Military Drill Surrounding To Taiwan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..