
China Corona Outbreak : चीनमधल्या विद्यापीठाची धक्कादायक कोरोना आकडेवारी
बीजिंगः मागील महिन्याभरापासून चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाल्याचं मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. चीनने यासंदर्भात तोंड उघडलेलं नाही. चीनमध्ये झालेल्या एका अभ्यासाननंतर धक्कादायक माहिती जगासमोर आलेली आहे.
चीनमधल्या पेकिंग विद्यापीठाने हादरवून सोडणारा खुलासा केला आहे. विद्यापीठाने एका अभ्यासात सांगितलं की, चीनमध्ये ११ जानेवारीपर्यंत ९० कोटी लोक कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झाले आहे. म्हणजे ६४ टक्के चिनी लोकांना कोरोनाची लागण झाली. चीनच्या सरकारी डेटामध्ये आतापर्यंत २० लाख लोकांना कोरोना झाल्याचं सांगण्यात आलंय.
हेही वाचाः सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'
पेकिंग युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासामध्ये गांसू प्रांतामध्ये कोरोनाचं सर्वाधिक संक्रमण झालंय. तिथले ९१ टक्के लोक कोरोनाबाधित झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर युन्नानचा नंबर लागतो. युन्नानमध्ये ८४ टक्के संग्रमण झालं. तर ग्रामीण भागात कोरोना वाढत असल्याचं एका महामारी तज्ज्ञाने सांगितलं.
चायनिज सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे माजी अध्यक्ष जेंग गुआंग यांनी सांगितलं की, चीनमध्ये कोरोना विषाणूचं संक्रमण दोन ते तीन महिने राहू शकतं. सध्या लाखो चिनी नागरिक २३ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या चिनी लूनर नवीन वर्षासाठी घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कोरोना वाढण्याचा धोका व्यक्त होतोय.
हेही वाचा: पुण्याच्या गर्लफ्रेंडसाठी भाऊनं विमानच थांबवलं; मग जे झालं त्याने सगळेच घाबरले
मागच्या महिन्यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यातील तपशील बाहेरही आला होती. त्यावेळी त्यांनी 'आपल्याला जीव वाचवावे लागतील. मिशन मोडवर काम सुरु करा' असे आदेश दिल्याचं सांगितलं जात होतं.