Chinese Balloon : अमेरिकेनंतर आता लॅटिन अमेरिकेत दिसला चिनी स्पाय बलून; पेंटागॉनकडून निवेदन जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chinese Balloon

Chinese Balloon : अमेरिकेनंतर आता लॅटिन अमेरिकेत दिसला चिनी स्पाय बलून; पेंटागॉनकडून निवेदन जारी

Chinese Balloon : अमेरिकेनंतर आता लॅटिन अमेरिकेतही चीनचा स्पाय बलून दिसून आला आहे, अशी माहिती पेंटागॉनने शुक्रवारी रात्री एक निवेदन जारी करत दिली आहे.

पेंटागॉनचे प्रवक्ते पॅट रायडर यांनी सांगितले की, अमेरिकेनंतर आता लॅटिन अमेरिकेच्या आकाशात चीनचा स्पाय बलून दिल्याचे वृत्त मिळाले आहे. त्यानुसार हा बलून चीनी स्पाय बलून असल्याचे गृहीत धरत असल्याचे रायडर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या आकाशात नजरेस पडणारा चायनीज बलून आणखी काही दिवस आकाशात राहिल अशी अपेक्षा असून, पेंटागॉन त्यावर लक्ष ठेवून आहे.

अमेरिकेच्या आकाशात चायनीय बलून दिसून आल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या अमेरिकेने परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांचा चीन दौरा रद्द केला आहे. तसेच, सर्व संवेदनशील डेटा सुरक्षित केला आहे.

अमेरिकेच्या आकाशात चायनीय बलून दिसून आल्याच्या घटनेनंतर संतप्त झालेल्या अमेरिकेने परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांचा चीन दौरा रद्द केला आहे. तसेच, सर्व संवेदनशील डेटा सुरक्षित केला आहे.

अमेरिकेत ज्या ठिकाणी चीनचा हा बलून दिसून आला आहे. तेथे अमेरिकेचा हवाई दलाचा तळ असून, या ठिकाणी अणु क्षेपणास्त्रेही तैनात आहेत. आकाशात दिसून येणाऱ्या या बलूनचा आकार तीन बसेस इतका आहे.

चीनने दिले स्पष्टीकरण

अमेरिकेच्याआकाशातील स्पाय बलूनवर चीनदेखील प्रतिक्रिया दिली असून, या बलूचा मार्ग चुकल्याचे म्हटले आहे. तसेच या मुद्द्यावर वाद न वाढवण्याचे आवाहन केले आहे. स्पाय बलूननंतर रद्द करण्याची भूमिका दुर्दैवी असल्याचे म्हणत अशा मुद्द्यांवर अमेरिकेने त्यांचा दृष्टीकोन बदलणे गरजेचे असल्याचे विधान केले आहे.