चीनच्या शांघाय शहरात कोरोनामुळे स्थिती चिंताजनक, कडक निर्बंध सुरुच

चीन कोरोना विषाणूमुळे त्रस्त आहे.
China Corona Updates
China Corona UpdatesGoogle

बीजिंग : चीन कोरोना विषाणूमुळे त्रस्त आहे. चीनच्या शांघाय शहरात कोविडमुळे आणखीन सात लोकांचा मृत्यू झाला आहे. कोविडच्या या नवीन लाटेत शांघायमध्ये आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत वृत्त ग्लोबल टाईम्सने शांघाय (Shanghai) आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाला देत दिले आहे.

२१ जणांची स्थिती गंभीर

शांघायमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोनाच्या (Corona) प्रकरणांमध्ये घट होऊन सुद्धा शहरात एकूण क्रियाशील रुग्णसंख्या अधिक झाली आहे. शांघाय आरोग्य प्राधिकरणाचे एक अधिकारी वू कियान्यू म्हणाले, की ३ हजार ८४ स्थानिक प्रकरणे आणि १७ हजार ३३२ स्थानिक लक्षणे रहित संक्रमणाचे प्रकरणांची नोंद झाली आहे. (Chinese City Shanghai Still Corona Cases Hikes)

China Corona Updates
मोठ्या पुरामुळे आफ्रिकेत आपत्कालीन स्थिती, ४०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू

अधिकाऱ्याने सांगितले, की २६ फेब्रुवारीपासून ते १८ एप्रिलपर्यंत शहरात २७ हजार ६१३ स्थानिक प्रकरणे समोर आली आणि २१ हजार ७१७ जण दवाखान्यात भरती आहेत. त्यात २१ जणांचा प्रकृती गंभीर आहे.

China Corona Updates
भारत-चीन सुसंवादाची किलकिली कवाडे!

आरोग्यमंत्री काय म्हणाले ?

चीनचे (China) आरोग्यमंत्री मा शियाओवेई म्हणाले, की देश कोविड १९ बाबत आपले झिरो-टोलरन्स धोरण सुरुच ठेवणार आहे. जर चीनने निर्बंध ढिले केल्यास मोठ्या प्रमाणावर वयस्कर आणि मुलांना धोका होईल. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकास प्रभावित होईल. एक छोटीशी चूक महामारी मोठ्या प्रमाणावर वाढण्यास मदत करु शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com