
वॉशिंग्टन : अमेरिकेत पिकांचा नाश करणाऱ्या बुरशीची तस्करी केल्याचा आरोप दोन चिनी संशोधकांवर काही दिवसांपूर्वी झाला. या घटनेनंतर जर अमेरिकेने काळजी घेतली नाही तर कोरोनाच्या साथीपेक्षा काहीतरी वाईट होऊ शकते, असा इशारा येथील चीनसंबंधीचे तज्ज्ञ गॉर्डन जी चँग यांनी दिला आहे, तसेच अमेरिकेने चीनबरोबरील संबंध तोडावेत, असा सल्ला त्यांनी दिला आहे.