Christchurch Mosque Shooting : एका महिलेसह तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 मार्च 2019

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधील ख्राईस्टचर्चच्या दोन मशिदींमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबार प्रकरणी न्यूझीलंड पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात एक महिला तर तीन  पुरुषांचा समावेश आहे. 

ख्राईस्टचर्चच्या वेगवेगळया भागात कारमध्ये स्फोटके सापडली असून, ही सर्व स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. अशी माहिती पोलिस प्रमुख माईक बुश यांनी दिली आहे. 

हल्ला केल्यानंतर हल्लेखोराने घटनास्थळावरुन पळ काढला होता. यासोबतच हल्लेखोराने लाईव्ह स्ट्रिमिंगदेखील केले होते. यानंतर अजून एका मशिदीत गोळीबार करण्यात आला होता.न्यूझीलंडमध्ये मशिदीबाहेर सशस्त्र पोलिस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाने ख्राईस्टचर्चमधील नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Christchurch Mosque Shooting four in custody