esakal | William J Burns | सीआयए अधिकारी 'हॅवाना सिंड्रोम'ग्रस्त, भारतात लागण?
sakal

बोलून बातमी शोधा

CIA अधिकारी 'हॅवाना सिंड्रोम'ग्रस्त, भारतात लागण?

CIA अधिकारी 'हॅवाना सिंड्रोम'ग्रस्त, भारतात लागण?

sakal_logo
By
ओमकार वाबळे

भारतात आलेल्या सीआयए या अमेरिकी गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्याला हॅवाना सिंड्रोमची लागण झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सिआयएचे संचालक विलिअम बर्न्स यांच्यासोबत आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये ही व्यक्ती होती. मायदेशी गेल्यानंतर या सिंड्रोमची लक्षणं जाणवली.

हे संपूर्ण प्रकरण नैसर्गिक आहे की, षडयंत्र याबाबत अमेरिकी यंत्रणा संशोधन करत आहेत. मात्र, 2016 पासून अमेरिकन अधिकाऱ्यांना दौऱ्यांच्या वेळी अशा प्रकारच्या आजारांनी प्रभावित होण्यासंबंधी घटनांमध्ये वाढ झाली आहे, असे माजी अधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार अन्य गुप्तचर संघटनांनी घडवून आणला आहे का, याची शहानिशा सुरू आहे. कदाचित हा अधिकारी संचालक बर्न्स यांच्यासमावेत प्रवास करत असेल, अशी संबंधित संघटनेला माहिती नसावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.

हेही वाचा: UNGA मध्ये जगातील नेत्यांपैकी मोदींची सर्वाधिक प्रतीक्षा - तिरूमूर्ती

लक्षणांचे कारण तपासण्यासाठी अधिकाऱ्यांनी धडपड सुरू आहे. काही अधिकाऱ्यांना खात्री आहे, की हा एक प्रकारचा हल्ला आहे. यामागे एक किंवा अधिक प्रतिस्पर्धी गुप्तचर संघटनांचा हात असल्याची शक्यता बळावली आहे. तसेच गुप्तचर संस्थांनी अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष काढलेला नाही.

loading image
go to top