Donald Trump News : डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाचा मोठा दणका! ठोठावला ३६ कोटी ४० लाख डॉलरचा दंड

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कमधील न्यायालयाने मोठा दणका दिला.
civil fraud case court orders Donald Trump 355 million dollars  penalty marathi news
civil fraud case court orders Donald Trump 355 million dollars penalty marathi news

न्यूयॉर्क, ता. १७ (पीटीआय) : अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे उमेदवारी मिळविण्यास इच्छुक असलेले माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना न्यूयॉर्कमधील न्यायालयाने मोठा दणका दिला. स्वत:च्या संपत्तीचे आकडे फुगवून सांगत गुंतवणुकदार आणि बँकांची अनेक वर्षे फसवणूक केल्याबद्दल न्यायालयाने ट्रम्प यांना ३६ कोटी ४० लाख डॉलरचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, ट्रम्प यांना पुढील तीन वर्षे न्यूयॉर्क कॉर्पोरेशनमध्ये कोणतेही पद स्वीकारण्यास मनाई केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वर्षे संपत्तीबाबतचे चुकीचे आकडे दाखवून आपल्या प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळविली आणि त्यामाध्यमातून बरीच संपत्ती आणि नावलौकिक कमावला आणि त्याच आधारे त्यांना एकदा अमेरिकेचे अध्यक्षपदही मिळाले, असा आरोप करत न्यूयॉर्कमधील वकील लेटिशिया जेम्स यांनी दोन वर्षांपूर्वी ट्रम्प यांच्याविरोधात दावा केला होता.

civil fraud case court orders Donald Trump 355 million dollars  penalty marathi news
Sunny Leone Admit Card : उत्तर प्रदेश पोलिसात भरती होण्यासाठी चक्क सनी लिओनीची अर्ज! प्रशासनाचा एकच गोंधळ

येथील कायद्यानुसार या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकारही जेम्स यांना प्राप्त झाला होता. आपल्या संपत्ती अधिक असल्याचे भासविल्याने ट्रम्प यांना अधिक रकमेची कर्जे मिळून व्याजदरातही सवलत मिळाली आणि त्याचाच आधार घेत एरवी क्षमता नसल्याने अशक्यप्राय वाटणारे प्रकल्पही त्यांना पूर्ण करता आले, असे जेम्स यांनी तपासणीनंतर न्यायालयात सिद्ध केले.
आजच्या निकालाविरोधात अपील करणार असल्याचे ट्रम्प यांच्या वकीलांनी जाहीर केले आहे. या प्रकरणात कायद्याच्या तरतुदींचा वापर करून मला अडकविण्यात आले आहे, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. मात्र, अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू असतानाच हा विरोधात जाणारा निकाल लागल्याने ट्रम्प यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.

civil fraud case court orders Donald Trump 355 million dollars  penalty marathi news
Shivrayancha Chhava Movie Review: छत्रपती संभाजी महाराजांचा हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? अंगावर उभे राहतील रोमांच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com