America Attack : अमेरिकी हल्ल्यांत १८ जण ठार झाल्याचा दावा

अमेरिकेने शुक्रवारी (ता.२) मध्यरात्री अडीचच्या (भारतीय वेळेनुसार) दरम्यान सकाळी इराक आणि सीरियातील सात ठिकाणी ८५ लक्ष्यांवर हवाई हल्ले केले.
america attack on syria
america attack on syriasakal

वॉशिंग्टन - अमेरिकेने शुक्रवारी (ता.२) मध्यरात्री अडीचच्या (भारतीय वेळेनुसार) दरम्यान सकाळी इराक आणि सीरियातील सात ठिकाणी ८५ लक्ष्यांवर हवाई हल्ले केले. इराणसमर्थक दहशतवादी आणि इराणमधील ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प’ (आयआरजीसी) ही संघटना कार्यरत असलेल्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आले.

‘सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्स वॉर मॉनिटर’ या संस्थेच्या दाव्यानुसार अमेरिकेच्या या हल्ल्यांत १८ जण ठार झाले.पाच दिवसांपूर्वी जॉर्डन- सीरिया सीमेवरील ड्रोन हल्ल्यात अमेरिकेचे तीन सैनिक ठार झाले होते. दहशतवाद्यांच्या या कृत्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात हल्ले केले.

सीरियातील सात आणि इराकमधील तीन अशा सात जागांवर क्षेपणास्त्र डागण्यात आली. दहशतवादी आणि (आयआरजीसी) ‘बी-वन स्ट्रॅटेजिक बॉँबर्सपासून कमांड अँड कंट्रोल सेंटर, रॉकेट, क्षेपणास्त्र, दारूगोळा आणि ड्रोनच्या गोदामाच्या जागेसह ‘आयआरजीसी’च्या हेरगिरी केंद्रांना अमेरिकेच्या सैन्यदलाने लक्ष्य केले.

लांब पल्ल्याच्या बॉँबर विमानांसह अमेरिकेच्या अनेक विमानांनी काल मध्यरात्री इराण आणि सीरियाकडे कूच केले. हवाई हल्ल्यांमध्ये अचूक लक्ष्यभेद करणारी १२५ पेक्षा जास्त युद्धसामग्री वापरली, अशी माहिती ‘अमेरिकेच्या सेंट्रल कमांड’ने (सेंटकॉम) दिली.

‘हे हल्ले सुमारे ३० मिनिटे सुरू होते,’’ अशी माहिती राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी पत्रकारांना दिली. ‘दहशतवाद्यांच्या वेगवेगळ्या तळांवर अनेक हल्ले करण्यात आले. यात झालेल्या नुकसानाची माहिती संरक्षण विभाग घेत असून हे हल्ले यशस्वी झाल्याचा अमेरिकेला विश्‍वास आहे आणि यापुढे आणखी कारवाई केली जाईल,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या हल्ल्यात सीरियामध्ये शस्त्रास्त्रांच्या गोदामासह इराणी समर्थक गटांच्या निवासस्थानांच्या परिसरातील २६ प्रमुख ठिकाणे नष्ट झाली आहेत, असे‘सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्यूमन राइट्स वॉर मॉनिटर’चे प्रमुख अब्देल रेहमान यांनी सांगितले. सीरियाच्या सीमेवर असलेल्या पश्चिम इराकमध्ये शस्त्रास्त्रांचे गोदाम आणि इराण समर्थक गटांचे कमांड सेंटरदेखील लक्ष्य केले, असे इराकच्या संरक्षण विभागातील स्रोतांनी सांगितले.

इराकचे पंतप्रधान महम्मद शिया अल सुदानी यांनी अमेरिकेच्या या सैनिकी कारवाईचा तीव्र निषेध केला असून आमच्या सार्वभौमत्वाचे हे उल्लंघन असल्याचे ते म्हणाले. पण किर्बी यांनी सुदानी यांचे विधान फेटाळले असून ‘हल्ला करण्यापूर्वी इराकी सरकारला त्याची माहिती दिली होती, असे ते म्हणाले. परंतु त्यावर इराककडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी काही सांगितले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com