Ban RSS In Canada : कॅनडात आरएसएसवर बंदी घालण्याचा दावा : नेमकं खरं काय? जाणून घ्या

कॅनडातील भारताच्या व्हिसा अर्ज केंद्राने गुरुवारी आपल्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित केली
Ban RSS In Canada
Ban RSS In Canadaesakal
Updated on: 

Ban RSS In Canada : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येच्या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढत आहे. कॅनडातील भारताच्या व्हिसा अर्ज केंद्राने गुरुवारी आपल्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा स्थगित केली आहे. दरम्यान, कॅनडा सरकारने आरएसएसवर बंदी घातल्याचा आणखी एक मोठा दावा केला जातोय. हा दावा कितपत खरा आहे?

या दाव्याची पुष्टी करण्यासाठी, एक्स (पूर्वी ट्विटर) वापरकर्ते एक व्हिडिओ देखील शेअर करत आहेत.अली सोहराबचे एक्सवर जवळपास 2.47 लाख फॉलोअर्स आहेत. त्याच वेळी, त्याच्या बायोवर त्याने स्वत:ला माजी पत्रकार म्हटलंय.इतर एक्स वापरकर्ते देखील दावा करत आहेत की कॅनडाने आरएसएसवर बंदी घातली आहे. एक्स युजर सदफ आफरीनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे - कॅनडानेही RSS वर बंदी घातली आहे! भारत आणि कॅनडामधील तणाव वाढत आहे!

Ban RSS In Canada
Health Care News: दह्यात ही पांढरी गोष्ट मिसळून कधीही खाऊ नका, नाहीतर...

असा दावा शेअर करणारे इतर अनेक युजर्स आढळले. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना, जितेंद्र चौधरी नावाच्या एका वापरकर्त्याने लिहिलंय की, मोठी बातमी कॅनडाच्या सरकारने आरएसएसवर बंदी घातली. जितेंद्रच्या एक्स अकाउंटवर नजर टाकली तर त्याचे 37 हजार फॉलोअर्स आहेत.एकूण 01 मिनिटे 04 सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असे म्हणताना ऐकू येते...

Ban RSS In Canada
Lungs Health: 'या' भाज्यांमुळे फुफ्फुस होईल निरोगी, श्वसनाचे आजार होतील दूर

NCCM च्या वतीने आम्ही चार मागण्या करत आहोत-

पहिला : भारतातील कॅनडाच्या राजदूताला तात्काळ परत बोलावण्यात यावे.

दुसरे: कॅनडातील भारतीय राजदूत, उच्चायुक्त श्री संजय कुमार वर्मा यांची हकालपट्टी करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करावी.

तिसरा: सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासह भारत आणि कॅनडा यांच्यातील व्यापार वाटाघाटींवर बंदी घालण्यात यावी.

चौथा: आम्ही (NCCM) WSO (वर्ल्ड शीख ऑर्गनायझेशन) सोबत मिळून RSS वर तात्काळ बंदी घालण्याची आणि कॅनडातून त्याचे एजंट काढून टाकण्याची मागणी करतो.

Ban RSS In Canada
Health Care News: वर्कआउट करताना रेझिस्टन्स बँड वापरण्याचे हे आहेत फायदे, जाणून घ्या

इथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की ही मागणी NCCM (द नॅशनल कौन्सिल ऑफ कॅनेडियन मुस्लिम) ने केली आहे. ही कॅनडा-आधारित संस्था आहे. तिचा मुख्य उद्देश कॅनेडियन मुस्लिमांच्या मानवी हक्क आणि नागरी स्वातंत्र्यांना प्रोत्साहन देणे आहे. त्याच वेळी, स्टीफन ब्राउन व्हिडिओमध्ये दिसत आहे, जे NCCM चे सीईओ आहेत.

Ban RSS In Canada
Health Care News: वारंवार चक्कर येण्याचा त्रास होतोय? मग लगेच करा ‘हे’ उपाय

स्वतः NCCM ने आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये ही माहिती शेअर केली आहे.NCCM ने RSS बद्दल काही बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. NCCM च्या अधिकृत वेबसाइटवर 01 मार्च 2023 रोजी प्रकाशित झालेला अहवाल आहे. या अहवालात संघटनेने आरएसएसवर प्रश्न उपस्थित केले होते आणि म्हटले होते, "कॅनडामध्ये आरएसएसची उपस्थिती देशाच्या सहिष्णुता आणि उदारमतवादी लोकशाहीला आव्हान आहे."

Ban RSS In Canada
Health Tips दुपारच्या जेवणानंतर सुस्ती आल्यासारखे वाटतं? या वाईट सवयी असू शकतात कारणीभूत

NCCM ने आपल्या अहवालात दावा केला होता की RSS हिटलर आणि नाझी विचारसरणीपासून प्रेरित आहे.NCCM वेबसाइटवर प्रकाशित अहवालाची लिंक तुम्हाला इथे मिळेल.हे स्पष्ट आहे की NCCM ने RSS वर बंदी घालण्याची मागणी केली आहे, पण कॅनडा सरकारकडून असे कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. अशा परिस्थितीत कॅनडाने आरएसएसवर बंदी घातली असल्याचा सोशल मीडियावर केला जात असलेला दावा पूर्णपणे खोटा आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Global Flower Festival Kolhapur 2026
Sakal Global Flower Festival in Kolhapur
Nagpur DJ Silent Until November 3 Police Ban Loud Sound During Ganeshotsav Navratri Pola Dahi Handi And Major Festivals
RSS Chief Mohan Bhagwat addresses the ‘Hindu Vishwa Bandhu – Embrace the World in Friendship’ event in Toronto, Canada
Marathi News Esakal
www.esakal.com