esakal | Covid-19: 'क्लिनिकल ट्रायल' म्हणजे काय ? कशी होते लशीची चाचणी
sakal

बोलून बातमी शोधा

clinical trial

सध्या जगभरात कोरोनाच्या लशींवर संशोधन सुरु आहे. बऱ्याच लशी चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत

Covid-19: 'क्लिनिकल ट्रायल' म्हणजे काय ? कशी होते लशीची चाचणी

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

वॉशिंग्टन: सध्या जगभरात कोरोनाच्या लशींवर संशोधन सुरु आहे. बऱ्याच लशी चाचणीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. पण अजून कोणत्याच कंपनीची लस बाजारात आलेली नाही. कोणतीही लस तयार करताना ती चाचण्यांच्या विविध टप्प्यांतून जात असते. लसीची सुरक्षितता तपासण्यासाठी संशोधक, डॉक्टर क्लिनिकल ट्रायलमध्ये लसीचं ट्रायल शेकडो स्वयंसेवकांवर करत असतात.

सध्या Pfizer and BioNtech आणि Moderna या अमेरिकास्थित कंपन्यांनी तयार केलेल्या लशी 95 टक्के प्रभावी ठरत असल्याची माहिती स्वतः कंपन्यांनी दिली आहे.  

नेमकं क्लिनिकल ट्रायलमध्ये काय केलं गेलं?
अमेरिकन औषधनिर्माती कंपनी Pfizer च्या लसीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये 44 हजार लोकांचा समावेश होता. त्यात अमेरिका, जर्मनी, तुर्कस्तान, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि अर्जेंटिनामधील लोकांनी या ट्रायलमध्ये भाग घेतला होता. जे स्वयंसेवक या ट्रायलमधून गेले त्यांना 21 दिवसांच्या अंतराने दोन डोस दिले गेले होते. 

तर मॉडर्नाची  Moderna-NIH लसीचे डोस 28 दिवसांच्या अंतराने अमेरिकेतील 30 हजार लोकांना दिले गेले होते. या लशींचे डोस किंवा प्लॅसबो कोणाला दिलं आहे हे ना स्वयंसेवकांना माहित आहे ना आरोग्य कर्मचाऱ्यांना. ही माहिती गुपित ठेवण्यात येते. प्लॅसबोला 'शुगर पिल'देखील म्हटलं जातं.

लस प्रभावी आहे का नाही हे कसं समजलं?
कोणतीही लस बाजारात येण्यापूर्वी ती योग्य चाचण्यांतून गेली पाहिजे, जर त्यात काही चुका झाल्या तर त्यामुळं मोठं नुकसान होऊ शकतं. ज्या स्वयंसेवकांचा या ट्रायलमध्ये समावेश केला होता त्यांनाही सगळ्यांप्रमाणे मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे आणि हात स्वच्छ धुण्यास सांगितले होते.

काही दिवसानंतर नैसर्गिकरित्या बऱ्याच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचं आढळलं ते संशोधकांना लगेच समजलं कारण स्वयंसेवकांना वारंवार आरोग्याची तपासणी करावी लागत होती. लस प्रभावी आहे हे ज्या लोकांना लसीचा डोस दिला आहे त्या ग्रुपच्या बाधितांची संख्या कमी आढळल्यामुले समजले. प्लेसबो दिलेल्या लोकांत बाधितांची संख्या जास्त होती. यावरून लशीचा प्रभाव उत्तम असल्याचे समजले होते.

लोकांना आजारी पडण्यापासून रोखणे आणि चांगल्या लसींमुळे लोकांना गंभीर आजारापासून संरक्षण देणे हे प्राथमिक हे औषधनिर्मिती कंपन्यांचे ध्येय असते. लोकांना संसर्ग होण्यापासून रोखणे आणि अशा प्रकारे हा विषाणू पुढे प्रसारित होण्यापासून थांबवणे हे मॉडर्नाचे ध्येय होते. अमेरिकी सरकारच्या ऑपरेशन वॉर्प स्पीडचे प्रमुख मॉन्सेफ स्लॉई यांनी बुधवारी सांगितले की, या लसी कमी कार्यक्षमतेच्या दराने महत्वाची उद्दिष्टे साध्य करतील. 

Pfizer ची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरल्याने लस डिसेंबरपर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Pfizer च्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी माहिती दिली होती की, 2020 मध्ये 5 कोटी, तर 2021 पर्यंत 1.3 अब्ज डोस तयार करण्याची तयारी आहे. दरम्यान, जगभरातील देश कोरोनावर प्रभावी लस तयार करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. अनेक कंपन्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेत आहे. त्यांचे निकाल लवकरच हाती येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताच्या तीन कोरोना लशी चाचणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत. 

(edited by- pramod sarawale)

loading image
go to top