corona vaccine updates:भारतातील क्लिनिकल चाचणीसंदर्भात रशियाची मोठी घोषणा

वृत्तसंस्था
Tuesday, 8 September 2020

कोरोनावरील लशीबद्दल जगभरात संशोधन सुरु आहे. यापुर्वी रशियाने त्यांची लस तयार केल्याचे 11 ऑगस्टला जाहीर केले आहे. भारतासह जगातील अनेक देशांना रशिया त्यांनी तयार केलेली लस देणार आहे.

मॉस्को-  'Sputnik V' Clinical Trial in India: कोरोनाच्या साथीने सध्या जगातील अनेक देशांमध्ये वाईट परिस्थीती आहे. कोरोनावरील लशीबद्दल जगभरात संशोधन सुरु आहे. यापुर्वी रशियाने त्यांची लस तयार केल्याचे 11 ऑगस्टला जाहीर केले आहे. भारतासह जगातील अनेक देशांना रशिया त्यांनी तयार केलेली लस देणार आहे. रशियाच्या कोरोना व्हायरसवरीवल 'Sputnik V'लसीच्या क्लिनिकल चाचण्या (Sputnik V Clinical Trial in India) या महिन्यापासून भारतासह इतरही अनेक देशांमध्ये सुरू होणार आहेत, अशी माहिती रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ- RDIF) चे मुख्य कार्यकारी अधिकारी किरील दिमित्रेव यांनी दिली आहे. भारतासह सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फिलिपिन्स आणि ब्राझील या देशांना रशिया Sputnik V लस देणार असून याची  क्लिनिकल चाचणी या महिन्यापासून सुरू होईल अशी माहितीही दिमित्रेव यांनी दिली.

रशियाने तयार केलेल्या लसीवर बोलताना दिमित्रेव म्हणाले की, 'Sputnik Vच्या नोंदणीनंतर 26 ऑगस्टपासून या लसीचा अभ्यास सुरू करण्यात आला होता. त्यात 40,000 हून अधिक लोकांचा सहभाग होता. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, फिलिपिन्स, भारत आणि ब्राझीलमध्ये या लसीची क्लिनिकल चाचणी या महिन्यापासून सुरू होईल. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये  लसीच्या तिसऱ्या टप्प्याचे तीन चाचण्यांचे प्राथमिक निकाल प्रकाशित केले जातील.' सध्या रशिया Sputnik V उत्पादनासंदर्भात  भारत सरकार आणि देशातील आघाडीच्या औषध कंपन्यांशी चर्चा करीत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 रशियाने 11 ऑगस्टला Sputnik V लसीची रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने नोंदणी केली होती. कोरोनावरील जगातील पहिली नोंदणीकृत झालेले ही लस ठरली होती.  'स्पुतनिक-व्ही' ही लस गमालय नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी फॉर रशिया आणि रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) यांनी विकसित केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 लसीसंदर्भात विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिमित्रेव यांनी माहिती दिली आहे की, भारत ऐतिहासिकदृष्ट्या रशियाचा एक महत्त्वाचा भागीदार देश आहे. उत्पादनक्षेत्रात तो जगातील प्रमुख देशांपैकी एक आहे.  जगात उत्पादित होणाऱ्या लशींपैकी 60 टक्के लशी भारतात तयार केल्या जातात. आम्ही भारत सरकार, संबंधित मंत्रालय आणि भारतीय उत्पादन कंपन्यांशी चर्चा करीत आहोत. आम्ही काही कंपन्यांशी करार देखील केले आहेत. "

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Clinical trial of COVID-19 vaccine Sputnik V to begin in India this month said by Russia