
काँगोच्या किन्शासा शहरात शुक्रवारी रात्री झालेल्या बोट अपघाताने पुन्हा एकदा देश हादरला आहे. क्रिसमस साजरा करण्यासाठी घरी परतणाऱ्या प्रवाशांनी भरलेली बोट बुसिरा नदीत उलटली. या भीषण दुर्घटनेत ३८ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक लोक अद्याप बेपत्ता आहेत.