cm devendra fadnavis
sakal
झ्युरिक (स्वित्झर्लंड) - दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले. यावेळी झ्युरिक विमानतळावर येथील बृहन महाराष्ट्र मंडळाकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यावेळी झालेल्या स्वागत समारंभात मुख्यमंत्र्यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वधर्म, स्वदेश आणि स्वभाषेचा वसा घेऊन भारताला विकासाच्या उत्तुंग वाटेवर घेऊन जाऊया’, असे आवाहन केले.