कोरोनात भारताच्या मदतीसाठी धावा, अन्यथा संपूर्ण जग...

india corona
india coronaguardian

न्यूयॉर्क- भारतात कोरोनाने (corona ) थैमान घातले असून ही स्थिती जगासाठी धोक्याची घंटी आहे. संपूर्ण जग जोपर्यंत भारताच्या मदतीसाठी धावणार नाही, तोपर्यंत भारतातील कोरोनाचा कहर दिसत राहील, असे युनिसेफचे (unisef) म्हटले आहे. भारतातील दुसऱ्या लाटेने जग देखील हादरले आहे. मृतांचा आणि रुग्णांचा दिवसेंदिवस वाढणारा आकडा पाहता जागतिक संघटनांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. यासाठी जगभरातून मदत केली जात असली तरी पुरेशी नसल्याचे युनिसेफचे म्हणणे आहे. (corona covid19 unisef said help india otherwise world would be in danger)

यूनिसफेकडून आतापर्यंत भारताला २० लाख फेसशिल्ड आणि दोन लाख मास्कसह महत्त्वाच्या वैद्यकीय उपकरणाचा पुरवठा केला आहे. युनिसेफचे कार्यकारी संचालक हेनरिटा फोर यांनी म्हटले की, भारतातील सध्याची भयानक स्थिती ही जगाला धोक्याची घंटा आहे. जोपर्यंत भारताला ठोस मदत केली जात नाही, तोपर्यंत तेथे कोरोनाबाधितांचे मृत्यू, संसर्गाच्या प्रकारात होणारे बदल आणि मदतीला होणारा विलंब यासारख्या घटना जगाला पाहावयास मिळत राहतील.

india corona
तालिबान दहशतवादी लोकांना पाण्यासाठी तरसवणार

दररोज तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण

भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून दररोज तीन ते चार लाख रुग्ण आणि तीन हजाराहून अधिक मृत्यूची नोंद होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतात कोरोनाबाधितांची एकूण संख्या २०.६ दशलक्ष असून २,२६००० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आशियायी क्षेत्रातील अन्य देशातही रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु एकूण रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीचा विचार केल्यास भारताचे प्रमाण ९० टक्के आहे, असे संघटनेने म्हटले आहे.

भारतात ऑक्सिजनची टंचाई

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जागतिक पातळीवरच्या नवीन रुग्णांची आणि मृतांच्या आकडेवारीचा विचार केल्यास भारतात कोरोनाचे प्रमाण लक्षणीय वाढल्याचे लक्षात येते. सद्यःस्थितीत जगातील एकूण बाधितांपैकी ४६ टक्के रुग्ण आणि एकूण मृतांपैकी २५ टक्के मृत हे भारतातील आहेत. यूनिसेफच्या मते, दक्षिण आशियात दिसून येणारे चित्र अन्य ठिकाणी दिसत नाही. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णाचे कुटुंब मदतीसाठी धावपळ करत आहेत. भारतातील आरोग्य कर्मचारी देखील हैराण झाले आहेत. परिणामी आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याने अनेकांचा मृत्यू होत आहेत.

india corona
चीन जगाच्या जीवावरच उठलंय? अंतराळातून ओढावणार संकट

युनिसेफचे मदत

यूनिसेफकडून भारताला कोविड चाचणी मशिनचा पुरवठा करण्यात आला आहे. याशिवाय महाराष्ट्र आणि ईशान्य भारतात २५ ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीसाठी युनिसेफचे सहकार्य लाभले आहे. देशभरात प्रवेशाच्या ठिकाणी सुमारे ७५ थर्मल स्कॅनरची उभारणी या संघटनेच्या मदतीने करण्यात आली आहे. कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर युनिसेफचे सातत्याने भारत सरकार आणि साह्य संघटनेच्या मदतीने काम केले आहे. देशातील सुमारे ६६० दशलक्ष लोकांत कोरोनासंबंधीची जनजागृती यूनिसेफने केली आहे. भारतात अतिरिक्त चाचण्या करण्यासाठी आणि ऑक्सिजन प्लांटसाठी तसेच अन्य वैद्यकीय पुरवठा करण्यासाठी २१ दशलक्ष डॉलरची गरज आहे. एकुणात कोविडपासून बचाव करण्यासाठी सुमारे ५० दशलक्ष डॉलरची गरज आहे, असे युनिसेफने म्हटले आहे.

विनाश थांबवण्यासाठी सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करायला हवेत आणि मित्र देशांनी शक्य तेवढी मदत तातडीने करणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने थोडाही वेळ न गमावता पावले उचलली पाहिजेत. ही एक नैतिक जबाबदारी नाही तर दक्षिण आशियातील घातक लाट आपल्या सर्वांनाच धोकादायक आहे. ही लाट वेळीच थोपविली नाही तर आतापर्यंत कमावलेले सर्वच गमावण्याची वेळ येईल, असं युनिसेफ रिजनल डायरेक्टर (दक्षिण आशिया) जॉर्ज लारेया म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com