चीनने लपवली कोरोनाची माहिती !

Corona info hide by China
Corona info hide by China

कोरोना विषाणूच्या संसर्गावर नियंत्रण मिळविल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) चीनचे वारंवार आणि भरभरून कौतुक केले असले तरी वास्तविक चीनने या संघटनेला अंधारात ठेवल्याचा दावा "असोसिएटेड प्रेसने (एपी) केला आहे. कोरोना विषाणूचे स्वरूप जाणून त्यावर लस निर्मिती करण्यासाठी आवश्‍यक असलेला जनुकीय नकाशा चीनने एक आठवडा दाबून ठेवला. याबाबतच्या आवश्‍यक चाचण्या, औषधांची माहितीही चीनने जगाला दिली नाही, असा आरोप आहे. असे असले तरी ज्या गतीने कोविड-19 जगभर पसरला अन्‌ जगात हाहाकार निर्माण झाला ते पाहता कोरोना विषाणूचे मुळ चीनच आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. कोरोना विषाणू हा प्रयोगशाळेत तयार केला की, तो विविध प्रकारच्या प्राणी, पक्ष्यांच्या माध्यमातून आला याची स्पष्टता अजून चीनने दिलेली नाही. चीनमधून कोणतीही खरी माहिती "फिल्टर' होऊनच ती जगाला दिली जाते. कोविड-19 ची नेमकी रहस्ये काय आहेत, हे मात्र अजूनही जगाला पूर्णपणे माहिती नाही. 

चीनमधून माहिती बाहेर जाण्यावर असलेले कडक निर्बंध, चीनच्या आरोग्य यंत्रणेतील कुरघोडीचे राजकारणामुळे जगाला कोरोनाबाबत उशीरा माहिती मिळून संसर्ग गतीने पसरल्याचे 'एपी'ने गोपनीय कागदपत्रे, ई-मेल, अनेक मुलाखतींच्या हवाल्याने म्हटले आहे. चीनमधील एका प्रयोगशाळेने जानेवारीला आरोग्य मंत्रालयाच्या आधीच जनुकीय नकाशा प्रसिद्ध केल्यानंतर मग अधिकृतपणे तोच नकाशा जाहीर केला गेला. यानंतरही आरोग्य संघटनेला हवी असलेली माहिती देण्यास चीनने दोन आठवडे लावले. या संघटनेने चीनचे अनेकदा कौतुक केले असले तरी हा देश माहिती पुरवित नसल्याची नाराजी आरोग्य संघटनेच्या अधिकाऱ्यांनी अनेकदा व्यक्त केल्याचे संयुक्त राष्ट्रांमध्ये झालेल्या अनेक बैठकांच्या नोंदींवरून दिसून आली आहे. आरोग्य संघटना चीनला झुकते माप देत असल्याचा आरोप करत अमेरिकेने नुकतेच या संघटनेशी संबंध तोडले. 

पूर्ण जनुकीय रचनेची माहिती ही चीनी सरकारने दोन जानेवारीला दिला; पण जागतिक आरोग्य संघटनेने 30 जानेवारीला आरोग्याशी संबंधित आणिबाणी जाहिर केली. "एपी'च्या अहवालात म्हटले आहे, की या कालावधीत कोरोनाचा विषाणू अधिक गतीने जगभरात पसरत गेला. कोरोना विषाणूचा परसरण्याचा वेग हा 100 ते 200 गतीपेक्षा ही जास्त होता. काही तासात नव्हे; तर काही दिवसात हा विषाणू जगभरातील अनेक देशांमध्ये पाय पसरु लागला होता. अख्खे जग कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली गेले. हे सावट पूर्णपणे बाजूला झालेले नाही. विशेषत: मौसमी पाऊस जिथे कोसळतो, त्या प्रदेशात तर कोरोना विषाणूंची गती अधिक वाढेल, असे संशोधक, डॉक्‍टर सांगत आहेत. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबतचे निवेदन वेळोवेळी प्रसिद्धिस दिले आहे. भारतात जूनपासून मोसमी पाऊस कोसळायला सुरवात होते. अगदी ऑक्‍टोबरपर्यंत हा कालावधी राहतो. या काळात भारतासारख्या देशांची नेमकी काय परिस्थिती होईल, हे आज तरी सांगता येत नाही. अशीच स्थिती अन्य देशांचीही आहे. "एपी'च्या अहवालातील नोंदीनुसार, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडले. याबरोबर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दोन अब्ज अमेरिकी डॉलरची मदत कोरोना विषाणूच्या विरोधी लढाईसाठी दिल्याची घोषणा केली होती. 

जागतिक आरोग्य संघटना संभ्रमात 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटना आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी अमेरिकेचे संबंध संपुष्टात आणण्याची घोषणा नुकतीच केल्यामुळे "एपी'च्या अहवालात हा मुद्दा समोर आला आहे. कोरोन विषाणू नष्ट करण्यासाठी दिलेल्या प्रतिसाद दृढ करण्यासाठी एका एजन्सीला दोन अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे. 
मात्र नवीन माहिती ही अमेरिका किंवा चीन या दोघांनाही समर्थन पुरवित नाही; परंतु त्याऐवजी आता मध्यभागी अडकलेली एक एजन्सी असल्याचे चित्र दिसते आहे. ज्या एजन्सीने दोन अब्ज डॉलरची मदत कोरोना विषाणूच्या विरोधात उभी राहण्यासाठी दिली होती. जी एजन्सी स्वतःच्या अधिकाराची मर्यादा असूनही अधिक डाटा (माहिती) मागवण्याचा तातडीने प्रयत्न करीत असल्याचे "एपी'च्या अहवालात म्हटले आहे. 

"एपी'ने नोंदवलेल्या रेकॉर्डिंगमध्ये असे दिसून आले आहे, की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चीनने जागतिक आरोग्य संघटनेला कमी माहिती देऊन अंधारात ठेवले. तथापि, जागतिक आरोग्य संघटनेने अधिक माहिती मिळवण्याच्या आशेवर चीनचे जाहीरपणे कौतुक केले. इथेच खरी गोम दिसून येते. हा वाद जागतिक आरोग्य संघटना आणि चीनमध्ये वरकरणी दिसत असला तरी यापाठीमागे अनेक कारणे आहेत. असे असली तरी कोरोना विषाणूने जगाचा विद्‌ध्वंस केला, हे सत्य आहे. यात सामान्य नागरिकांबरोबर श्रीमंतही भरडले गेले. चीनमधून हा विषाणू जगभरात पसरत गेला. चीनने यासंबंधिची माहिती वेळोवेळी जागतिक आरोग्य संघटनेला प्रामाणिकपणे दिली असती तर जगासमोर हे संकट उभेच राहीले नसते. पण म्हणतात जर-तर मध्ये आला की, प्रश्‍न सुटत नाहीत; ते अधिक वाढत राहतात. आज कोरोनामुळे अख्खे जग लॉकडाऊन झाले. याचा फटका जागतिक अर्थकारणावर बसला. जग अक्षरश: दहा ते 15 वर्षे मागे गेले. ही हानी भरुन काढण्यासाठी वेळ जाणार. "एपी'मध्ये असलेल्या अहवालात असे स्पष्ट दिसते की, चीननेच हे षडयंत्र रचले. हे प्रचंड मोठे कटकारस्थान आहे, असे अनेक तज्ज्ञ गेली दोन महिने सांगत होते. मुद्दा असा आहे, की चीनने याचा सुगावा अजूनही लागू दिलेला नाही. 
आता चीनवर कशापद्धतीने दबाव आणता येईल, यावर संयुक्त राष्ट्राची आरोग्य एजन्सीच्या अधिका-यांनी चर्चाही केली. आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत, जागतिक आरोग्य संघटनेकडून जागतिक संकटाच्या बाबतीत माहिती सामायिक करणे आणि संबंधित सदस्य देशांना सतर्क करणे अपेक्षित आहे. 

तथापि, चीनमधील "डब्ल्यूएचओ'चे प्रतिनिधी डॉ. गौडेन गलिया यांनी "एपी'ला सांगितले की, ही एजन्सी इतर देशांना सांगण्यापूर्वी माहितीवर स्वाक्षरी करण्याची इच्छा आम्हाला करू शकत नाही; कारण ती आमच्या जबाबदारीचा आदर करत नाही. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एजन्सीच्या अधिकाऱ्यांना भीती वाटत होती की, 2002 मध्ये चीनमधील सिव्हीएर ऍक्‍युट रिस्पायरेटरी सिन्ड्रोमच्या (सार्स) उद्रेकाची पुनरावृत्ती असू शकते. "डब्ल्यूएचओ'च्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक मायकेल रायन यांनी "एपी'ला सांगितले की, चीनचे संरक्षण करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे "एजन्सी'ने स्वतंत्र डाटा (माहिती) विश्‍लेषण करणे. वॉशिंग्टन विद्यापीठातील आरोग्य मेट्रिक्‍स आणि मूल्यांकन संस्थेचे प्रा. अली मोकद्द म्हणाले, चीन आणि "डब्ल्यूएचओ'ने वेगवान कृती केली असती तर आपण जास्त लोकांचे प्राण वाचवू शकलो असतो. बऱ्याच जणांचा मृत्यू टाळू शकलो असतो. तथापि, सिडनी विद्यापीठातील जागतिक आरोग्याचे प्रा. ऍडम काम्राड-स्कॉट यांनी सांगितले की, "डब्ल्यूएचओ'ने जास्त दबाव आणला असला तर चीनने त्याला बाहेर काढण्याची जोखीम वाढविली असेल. 

जनुकीय क्रम जारी करण्यास विलंब 
"एपी'च्या अहवालानुसार, 27 डिसेंबर 2019 रोजी चीनमधील व्हिजन मेडिकल्स प्रयोगशाळेने कोरोना विषाणूच्या जनुकीय रचना एकत्र केली होती. ज्यामध्ये "सार्स' विषाणूशी समानता होती. नंतर प्रयोगशाळेने वूहानमधील अधिकारी आणि चिनी ऍकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेस यांना त्याचे निष्कर्ष सांगितले होते. 

30 डिसेंबर 2019 रोजी वुहानमधील आरोग्य अधिकाऱ्यांनी असामान्य अशा "निमोनिया'चा इशारा दिला होता. एक दिवसानंतर "डब्ल्यूएचओ'ला पहिल्यांदा या प्रकरणांबद्दल "ओपन-सोर्स प्लॅटफॉर्म'वरुन माहिती मिळाली, की कोरोना विषाणूच्या उद्रेकांबद्दल बुद्धिच्या माध्यमातून शोध घेता येतो. "डब्ल्यूएचओ'ने 1 जानेवारीला या प्रकरणांबद्दल अधिक माहितीची विनंती केली होती. दोन दिवसांनंतर चीनने उत्तर दिले, की तेथे 44 प्रकरणे झाली आहेत; पण मृत्यूची नोंद नाही. 2 जानेवारीपर्यंत चीनी शास्त्रज्ञांनी जनुकीय रचना असलेला हा विषाणू पूर्वी कधीच पाहिला नव्हता. हे जाणून घेण्यासाठी पूर्णपणे "डी-कोडींग' केले होते. तथापि, चीनमधील राष्ट्रीय आरोग्य आयोगाने 3 जानेवारी रोजी एक गोपनीय नोटीस बजावली आणि प्रयोगशाळांना नमुने नष्ट करण्याची मागणी केली. 

तीन राज्य प्रयोगशाळांनी स्वतंत्रपणे या विषाणूचे संपूर्ण स्पष्टीकरण "डीकोड' केले होते आणि चिनी आरोग्य अधिकारी अद्याप याबाबत मौन बाळगू शकतात, असे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, "डब्ल्यूएचओ'ने जाहीरपणे सांगितले की, अद्याप चौकशी सुरु आहे. 5 जानेवारी रोजी शांघाय पब्लिक क्‍लिनिकल हेल्थ सेंटरच्या विषाणू तज्ज्ञांनी असा इशारा दिला की, हा विषाणू संसर्गजन्य आहे. त्याच दिवशी "डब्ल्यूएचओ'ने चीनच्या प्राथमिक माहितीच्या आधारे जगाला सांगितले, की संक्रमणाचा कोणताही पुरावा नाही. इथे सगळी गफलत स्पष्टपणे दिसत आहे. चीन आणि जागतिक आरोग्य संघटना कशी परस्परविरोधी नोंदी आणि माहिती लपवत होती, ते पाहिले की मन सुन्न होऊन जाते. 

"डब्ल्यूएचओ'ची चीनला सहल 
13 जानेवारी रोजी थायलंडने कोरोना विषाणूच्या घटनेची पुष्टी केली आहे, अशी घोषणा "डब्ल्यूएचओ'ने केली. तेव्हा चिनी अधिकाऱ्यांना धक्का बसला, असे "एपी'च्या अहवालात म्हटले आहे. यामुळे चीनच्या उच्च वर्तुळातील आरोग्य अधिकाऱ्यांना गोपनीय दूरसंचाराद्वारे ही माहिती घेतली. ज्यामुळे देशाला साथीच्या रोगांची लागण होऊ शकते. तसे आदेशही देण्यात आले होते. चिनी "सीडीसी'ने अंतर्गत आणीबाणीच्या पातळीवर जाहीर केली तरीही अधिकारी सांगत होते की, मानवांमध्ये कोरोना विषाणूंचे संक्रमणाची शक्‍यता कमी आहे. 
या काळात "डब्ल्यूएचओ' संभ्रमावस्थेत होती. प्रथम तेथे मर्यादित प्रसार असल्याचा दावा केला; परंतु नंतर असे म्हटले की, कोरोना विषाणूच्या संक्रमणाचा कोणताही पुरावाच नाही. 
20 जानेवारी रोजी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी साथीच्या माहितीचे वेळेवर प्रकाशन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. असे असूनही "डब्ल्यूएचओ'च्या अधिकाऱ्यांनी चीनकडून डाटा (माहिती) मिळविण्यासाठी संघर्ष केला. त्याच दिवशी "यूएन एजन्सी'ने वुहान येथे अधिकाऱ्यांची एक चमू रवानगी केला होता. 
चीनमधील "डब्ल्यूएचओ'चे प्रतिनिधी गलिया म्हणाले की, चीनमधील काही भागातील लोक मानव ते मानवी संक्रमणाबद्दल उघडपणे आणि सातत्याने बोलत होते.  22 जानेवारी रोजी "डब्ल्यूएचओ'ने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करावी की नाही हे ठरवण्यासाठी एक समिती नेमली. नंतर काही बैठका घेतल्यानंतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी त्याविरोधात निर्णय घेतला. एक दिवसानंतर "डब्ल्यूएचओ'चे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसिस यांनी कोरोना विषाणूचा प्रसार मर्यादित असल्याचे वर्णन केले होते. 
त्या नंतरच्या काही दिवसांत चीनमध्ये कोविड-19 प्रकरणाचा उद्रेक झाला. तथापि प्रशासनाने अद्याप याबाबत तपशीलवार माहिती जाहीर केली नाही. खरेतर इतकी माहिती असूनही ती माहिती दाबून का ठेवली हे रहस्य आहे. 
टेड्रॉस यांनी 28 जानेवारी रोजी चीनी अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेण्यासाठी बीजिंगचा प्रवास केला. अहवालात असे नमूद केले गेले आहे, की "डब्ल्यूएचओ'चे संचालक जनरल यांनी उद्रेक तपासणीच्या व्यावहारिकतेमध्ये थेट हस्तक्षेप करणे हे विलक्षण आहे, अशी नोंद केली. टेड्रॉसच्या कर्मचाऱ्यांनी माहितीसाठी विनंत्यांची यादी तयार केली होती. 
आपल्या सहलीच्या शेवटी टेड्रोसने चीनची बांधिलकी अविश्वसनीय आहे असे म्हटले. दुसऱ्या दिवशी "डब्ल्यूएचओ'ने आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी जाहीर केली. टेड्रोसने पुन्हा चीन आणि त्याच्या सहकार्याचे कौतुक केले. चीन जे करीत आहे, त्याबद्दल आपण खरोखर आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. इतर देशांमध्ये विषाणूंचा प्रसार मर्यादित करण्यासाठी त्याने यापूर्वीच अविश्वसनीय गोष्टी केल्या आहेत, असे ते म्हणाले होते. 
 

दृष्टीक्षेप.. 
- चीनने जगाला बरीचशी माहिती अत्यंत ऐनवेळी दिली, त्याआधी दाबून ठेवली. 
- चीनने जागतिक आरोग्य संघटनेला कमीत कमी माहिती दिली, बाकी अंधारातच ठेवली 
- गोड बोलून चीनकडून माहिती काढून घेण्यासाठीच आरोग्य संघटनेकडून कौतुकाचा वर्षाव 
- विषाणूचा जनुकीय नकाशा जानेवारीला तयार झाला अन्‌ महामारी जानेवारीला जाहीर झाली. या दरम्यान संसर्ग जगभर फैलावला. 

वाद-प्रतिवाद असेही... 
चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ऍन्ड प्रिव्हेंशनचे मुख्य साथीच्या रोग विशेषज्ञ वू झुन्यो यांच्या मते, या रोगाबद्दल चीनने जानेवारीत "डब्ल्यूएचओ'ला "अज्ञात निमोनियाचा उद्रेक' झाल्याची माहिती दिली होती. ते म्हणाले होते,""आम्ही डब्ल्यूएचओ आणि इतर देशांना सांगितले की, आम्ही कारण शोधून काढू. तेव्हा आम्ही पुन्हा अहवाल देऊ असेही सांगितले होते. जानेवारीत कोरोना विषाणूला न समजलेला निमोनियाचा मुख्य म्हणून विलग केले गेले. तेव्हा चीनने ताबडतोब "डब्ल्यूएचओ'ला याबाबतीच माहिती दिली.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले की, आम्ही कोरोना विषाणूच्या "टाइमलाइन'चा बारकाईने बारकाईने विचार केला. हा मानवजातीसाठी अज्ञात विषाणू होता आणि त्यास अधिक जाणून घेण्यासाठी वेळ लागला; परंतु यापूर्वी कधीही न पाहिलेला हा रोग शक्‍य तितक्‍या लवकर "डिकोड' करण्यासाठी चिनी वैज्ञानिकांनी प्रयत्न केले. हे सांगणे योग्य आहे की, चीनने साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी सर्वात व्यापक आणि कठोर उपाययोजना केल्या आहेत. "असोसिएटेड प्रेस'च्या अहवालाविषयीच्या प्रश्‍नाला उत्तर देताना ते म्हणाले,""जानेवारीत चीनमध्ये कोरोना विषाणूचा उद्रेक झाल्यामुळे "डब्ल्यूएचओ'ने बीजिंगने दिलेल्या माहितीसाठी विलंब केला.'' 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com