कोरोना विषाणूने चीनमध्ये आतापर्यंत किती नागरिकांचा घेतला बळी

पीटीआय
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

नवे औषध येणार
कोरोनाला रोखण्यासाठी चीन सरकारने रेमदेसवीर हे औषध बाजारात आणण्याचे ठरविले आहे. सुरुवातीला त्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जाणार असून, ते लवकरच सर्व रुग्णालयांना उपलब्ध करून देण्यात येईल. इबोला विषाणूंच्या संसर्गावेळी याचाच वापर करण्यात आला होता.

बीजिंग / नवी दिल्ली - चीनमधील कोरोना विषाणूंचा संसर्ग काही केल्या थांबताना दिसत नाही. आज दिवसभरात विविध भागांमध्ये ७३ लोकांचा बळी गेल्याने मृतांची एकूण संख्या ५६३ वर पोचली असून, २८ हजार १८ जणांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नव्याने ३ हजार ६९४ लोकांना विषाणूंचा संसर्ग झाल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. आज मरण पावलेल्यांमध्ये ७० जण हे हुबेई आणि वुहान प्रांतातील आहेत. या विषाणूने चीनमधील ३१ राज्यांना कवेत घेतले आहे. सुरुवातीला हुबेई प्रांतामध्ये विषाणूंचा सर्वाधिक वेगाने प्रसार झाला होता. नव्याने या विषाणूंची लागण झाल्याची ५ हजार ३२८ प्रकरणे उघडकीस आली असून, यातील तीन हजारांपेक्षाही अधिक रुग्ण हे एकट्या हुबेई प्रांतातील आहेत.

मोठी ब्रेकिंग : चीन 20 हजार कोरोनाग्रस्तांना ठार मारणार?; कोर्टाकडे मागणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Corona virus has killed so many civilians in China so far

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: