कोरोना गेला; पण फुप्फुस बिघाड राहिला

वृत्तसंस्था
Saturday, 8 August 2020

कोरोना विषाणूचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या वुहानच्या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या 90 टक्के व्यक्तींच्या फुप्फुसांच्या कार्यक्षमतेत बिघाड झाला आहे. काही जणांना प्राणवायू यंत्रावर अवलंबून राहावे लागत आहे.

वुहान (चीन) - कोरोना विषाणूचे उगमस्थान मानल्या जाणाऱ्या वुहानच्या संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या 90 टक्के व्यक्तींच्या फुप्फुसांच्या कार्यक्षमतेत बिघाड झाला आहे. काही जणांना प्राणवायू यंत्रावर अवलंबून राहावे लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वुहान विद्यापीठाच्या झोंगनान रुग्णालयाचे संचालक पेंग झीयाँग यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही पहाणी केली. आणखी एक पाहणी बिजिंग विद्यापीठाच्या डोंगझीमेन रुग्णालयाने केली.

प्रमुख नोंदी

 • एप्रिलपासून 100 व्यक्तींची उपचारोत्तर तपासणी
 • चालण्याच्या क्षमतेचे मोजमाप करण्यासाठी चाचण्या
 • कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्ती सहा मिनिटांत केवळ 400 मीटर अंतर चालू शकतात
 • सुदृढ व्यक्ती तेवढ्याच वेळेत 500 मीटर चालू शकतात
 • एका वर्षाच्या कालावधीसाठी हा उपक्रम
 • पहिला टप्पा जुलैमध्ये पूर्ण
 • बऱ्या झालेल्या रुग्णांचे सरासरी वय 59
 • डिस्चार्ज मिळाल्यानंतर तीन महिने उलटूनही काही जणांना प्राणवायू यंत्राची (ऑक्सीजन मशीन) गरज
 • अशा व्यक्तींचे वय 65 पेक्षा जास्त
 • 10 टक्के रुग्णांमध्ये कोरोनाविरुद्ध लढणारी प्रतिपिंड नाहीशी झाली
 • प्रतिकारशक्तीची यंत्रणा अद्याप पूर्णपणे सावरलेली नाही
 • नैराश्य तसेच समाजाने कलंक ठेवल्याचे दुःख

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona went but the lungs failed