सावधान हवेतूनही होतोय कोरोनाचा संसर्ग

वृत्तसंस्था
सोमवार, 6 जुलै 2020

हवेच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूचे छोटे छोटे कण हवेतही जिवंत राहतात आणि त्यामुळे लोकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो, असे शास्त्राज्ञांनी स्पष्ट केले आहे. ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले असून त्यामध्ये ही महत्वाची बाब समोर आली आहे.

नवी दिल्ली : हवेच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना विषाणूचे छोटे छोटे कण हवेतही जिवंत राहतात आणि त्यामुळे लोकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो, असे शास्त्राज्ञांनी स्पष्ट केले आहे. ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांनी एक संशोधन केले असून त्यामध्ये ही महत्वाची बाब समोर आली आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा होतो यासंदर्भातील माहिती जारी केली होती. त्यानुसार हा विषाणू हवेतून पसरत नाही असा दावा करण्यात आला होता. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने असे स्पष्ट केले होते की, हा विषाणू शिंक, खोकला, कफ आणि बोलण्याच्या माध्यमातून पसरू शकतो.

दरम्यान, या ३२ देशांच्या २३९ शास्त्रज्ञांनी जागतिक आरोग्य संघटनेला याबाबत एक सविस्तर पत्र लिहलं आहे. कोरोना विषाणूचा प्रसार हवेतून होत आहे. त्याचे सर्व पुरावेही आहेत. त्यानुसार करोनाच्या विषाणूचे छोटे-छोटे कण हवेत तरंगतात. ते लोकांमध्ये करोनाचा संसर्ग होण्यास पुरेशे आहेत. त्यामुळे यावर पुन्हा एकदा संशोधन करण्याची विनंती आहे. हे पत्र सायन्टिफिक जर्नलमध्ये पुढील आठवड्यात प्रकाशित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

२०१९ वर्षाअखेरीस चीनमधील वुहान येथे कोरोना व्हायरस आढळून आला होता. यानंतर आता जवळपास सर्वंच जगभरातील देशांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. हवेच्या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या या दाव्यावर जागतिक आरोग्य संघटनेने मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, जगात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच चालला आहे. जगात आतापर्यंत एक कोटी १५ लाखांपेक्षा जास्त जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. पाच लाख ३६ हजार जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus Is Airborne, Say Scientists, Ask WHO To Revise Rules

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: