esakal | कोरोनाच्या प्रसाराबाबत मोठी बातमी; लहानग्यांच्या शिंकेतून...
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

- नाकातील द्रव पदार्थ अधिक असल्याने प्रसार; शास्त्रज्ञांचा दावा 

कोरोनाच्या प्रसाराबाबत मोठी बातमी; लहानग्यांच्या शिंकेतून...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शिकागो : लहान मुलांच्या शिंकेतून कोरोनाचा प्रसार अधिक वेगाने होत असल्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. अमेरिकेतील शिकागोच्या 'एन अँड रॉबर्ट एच. लुरी बालरूग्णालयातील पाच वर्षाखालील मुलांवर केलेल्या अध्ययनातून ही बाब समोर आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जास्त वयाच्या मुलांच्या तुलनेत या मुलांच्या नाकात द्रव पदार्थ अधिक असतो. तसेच विषाणूंसाठी आवश्‍यक जनुकांची संख्याही जास्त असल्याने हा प्रसार वेगाने होत असल्याचे बालरोगतज्ज्ञांनी म्हटले आहे. 'जेएएमए पिडीयाट्रिक्‍स'या शोधपत्रिकेत नुकतेच हे संशोधन प्रकाशित झाले आहे. 

कसे झाले संशोधन : 

- सौम्य लक्षणे दिसणाऱ्या 145 मुलांची निवड 

- वय वर्ष पाचपर्यंत, 5 ते 17, 18 ते 65 अशा वयोगटांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला 

- प्रत्येकाच्या नाकातील विषाणू प्रसाराची क्षमता (व्हायरल लोड) तपासण्यात आली निष्कर्ष व मर्यादा :

- पाच वर्षापर्यंतच्या मुलांमधून कोरोनाचा प्रसार वेगाने होण्याची शक्‍यता 

- मुलांच्या नाकातील द्रव पदार्थात जनुकांची संख्या अधिक

- शाळा आणि डे केअर सेंटर सुरू करताना योग्य काळजी घेणे आवश्‍यक

- प्राथमिक संशोधनातून ही शक्‍यता वर्तविण्यात आली आहे 

================

पाच वर्ष वयापर्यंतच्या मुलांमध्ये श्‍वसनाशी निगडित आजारांचे जलद गतीने प्रसार होतो. कोविडचा प्रसार पाहता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने लहान मुलांचे एकत्रिकरण करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. आमचे संशोधन अशा प्रसाराची शक्‍यता दर्शवत आहे. 

- डॉ. टेलर हेल्ड-सार्जंट, संसर्गजन्य आजारातील बालरोगतज्ज्ञ, शिकागो, अमेरिका.