युरोप नाही, अमेरिका नाही, कोरोनाचं ब्राझीलमध्ये थैमान

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 29 मे 2020

बुधवारी एक हजार 86 मृतांची नोंद झाली. नव्या रुग्णांचा आकडा 20 हजार 599, तर एकूण आकडा चार लाखाच्यावर गेला.

रिओ डी जानेरो : कोरोना संसर्गाचे केंद्रबिंदू आता ब्राझील बनले असून सलग दुसऱ्या दिवशी हजारहून जास्त मृतांची नोंद झाली. साओ पावलोसारख्या शहरांत कुटुंबातील सदस्य दगावल्यानंतर त्याच्या शवपेटीवर डोके ठेवून रुदन करणारे नातेवाईक ह्रदय हेलावून टाकत आहेत.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बुधवारी एक हजार 86 मृतांची नोंद झाली. नव्या रुग्णांचा आकडा 20 हजार 599, तर एकूण आकडा चार लाखाच्यावर गेला. एकूण रुग्णांच्या बाबतीत ब्राझीलचा अमेरिकेनंतर दुसरा क्रमांक आहे. ब्राझीलमध्ये सर्वाधिक फटका साओ पावलोलसा बसला असला तरी या प्रांताचे गव्हर्नर जोओ डोरिया यांनी येत्या सोमवारपासून उद्योगधंदे टप्याटप्याने सुरु करण्याची घोषणा केली. 15 जुनपर्यंत क्वारंटाइन कायम राहिल. रुग्णांच्या संख्येतील घट आणि "आयसीयू बेड'ची उपलब्धता यांनुसार आर्थिक व्यवहार सुरु केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

अमेरिकेतला मृतांचा आकडा धक्कादायक; वाचा सविस्तर बातमी

आदिवासी नेत्याची अध्यक्षांकडे मागणी 
ऍमेझॉनमधील आदीम जमातींमधील संसर्ग सर्वाधिक चिंतेचा ठरला आहे. झिंगू या जगातील एका सर्वांत मोठ्या खोऱ्यात याच आठवड्यांत दोन मृतांची नोंद झाली. कायापो आदिम जमातीचे ते बांधव होते. अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांनी ऍमेनच्या विकासाला सक्रीय प्रोत्साहन दिले आहे, मात्र लॉकडाउनमुळे लाकुडतोडे, खाणकामगार आणि मच्छीमार बेकायदा प्रवेश करीत आहेत. त्यांच्यामुळे संसर्गाचा वेग वाढल्याचा दावा या जमातीचे नेते मेगारोन टीक्‍सूकार्रामाइ यांनी केला. अशा कामगारांना प्रवेश करण्यापासून रोखावे, अशी मागणीही त्यांनी केली. "फुनाई' या आदिवासींच्या सरकारी संस्थेने तसा आदेश मार्चच्या मध्यालाच लागू केला होता. यानंतरही धर्मप्रचारक, आरोग्य सेवक यांचाही प्रवेश होत असल्यामुळे संसर्गात आणखी वाढ झाली. "विषाणू आणणारे आणि सोडणारे आम्ही नाहीत. महामारीचा गैरफायदा घेऊन आदिवासींची जमीन बळकावली जात आहे,' असा आरोपही त्यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus brazil one thousand deaths within 24 hours