esakal | ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांना करोनाची लागण
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus Brazils President Bolsonaro tests positive

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस झाले आहे. बोलसानोरो यांची कोविड-१९ चाचणी सकारात्मक आली असून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना महामारीमुळे ब्राझीलची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत असताना राष्ट्राध्यक्षांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांना करोनाची लागण

sakal_logo
By
वृत्तसंस्था

ब्राझिलिया : ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस झाले आहे. बोलसानोरो यांची कोविड-१९ चाचणी सकारात्मक आली असून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोना महामारीमुळे ब्राझीलची परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत असताना राष्ट्राध्यक्षांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ब्राझील हा लॅटिन अमेरिकेतील मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. ब्राझीलमध्ये एका दिवसात तब्बल ३८ हजार कोरोनाबाधित समोर आले आहेत. याच काळात येथे एक हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आता, ब्राझीलमधील कोरोना संक्रमितांचा आकडा आता १५ लाख ७७ हजारांवर पोहोचला आहे. तर ६४ हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

दरम्यान, बोलसोनारो हे फुफ्फुसांचा एक्स रे काढायला गेल्यानंतर त्यांच्या कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. यापूर्वीही बोलसोनारो यांनी स्वत:ला अस्वस्थ वाटत असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आज त्यांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मात्र, माझी प्रकृती उत्तम असल्याचं बोलसोनारो यांनी सीएनएन ब्राझीलशी बोलताना सांगितले आहे. तसेच, मी तज्ञांचा सल्ला घेत असून उपचार सुरु आहेत. त्यासोबतच, हायड्रोक्सोक्लोरोक्वीन, अँटी मलेरिया औषधांचा डोस घेत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयाने मे महिन्यात बोलसोनारो यांची कोविड-१९ची चाचणी सार्वजनिक केली होती. त्यावेळी, करण्यात आलेल्या तिन्ही चाचण्या निगेटीव्ह आल्या होत्या. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या भेटीनंतर बोलसोनारो यांनी मार्च महिन्यात या चाचण्या केल्या होत्या. जगभरात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्याचा आकडा सातत्याने  वाढतच चालला आहे. जगाचा विचार करता आतापर्यंत तब्बल ५.३० लाख लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.